Maharashtra Assembly Winter Session 2023 : विधामंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला (Maharashtra Assembly Winter Session ) उद्यापासून (7 डिसेंबर) सुरूवात होत आहे. त्यानिमीत्तानं आज सत्ताधारी आणि विरोधक नागपूरमध्ये (Nagpur) पोहोचले आहेत. दरम्यान, आज चहापानाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमावार विरोधकांनी बहिष्कार घातला आहे. याबबातची माहिती विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.
साडेपाच वाजता राज्य मंत्रीमंडळाची बैठक
विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज संध्याकाळी साडेपाच वाजता राज्य मंत्रीमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. तत्पूर्वी हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभुमीवर चहापानाचा कार्यक्रम पार पडणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांतर्फे सर्व पक्षांच्या आमदारांना आमंत्रण देण्यात आलं आहे. मात्र, या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे. विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एकत्रित नागपुरात दाखल होत आहेत.
सरसकट पंचनामे करायला अधिकाऱ्यांना सरकारनेच थांबवले
सरसकट पंचनामे करायला अधिकाऱ्यांना सरकारनेच थांबवले असा गंभीर आरोप विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर केला आहे. कटपुतळी सरकारमुळं शेतकरी संकटात असल्यानं आम्ही कर्जमाफीची मागणी करणार असल्याचे विजय वडेट्टीवार म्हणाले. एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांना साभाळतांना नागपूरकर उपमुख्यमंत्री हतबल झाल्याचे वडेट्टीवार म्हणाले. 1 हजार कोटी रुपयांचा गुटखा राज्यात विकला जात असल्याचेही ते म्हणाले. आज चहापाण्याचे निमंत्रण मिळाले आहे. शेतकऱ्यांचा डोळ्यात पाणी आहे, युवा बेरोजगारांच्या डोळ्यात पाणी आहे. अनेक मोर्चे या अधिवेशनात निघणार आहेत. अनेक प्रश्नामुळं महाराष्ट्र उध्वस्त होत आहे. त्यामुळं चहापानावर आम्ही बहिष्कार टाकला आहे आम्ही तिकडे जाणार नसल्याचे विजय वडेट्टीवार म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या: