Jallianwala Bagh Massacre : जालियनवाला बाग हत्याकांडाच्या या एका घटनेने देशाच्या इतिहासाची दिशाच बदलून टाकली आणि या घटनेने भारताच्या स्वातंत्र्याचा पाया रचला असे अनेक इतिहासकार म्हणतात. 103 वर्षांपूर्वी असेच एक वेदनादायक हत्याकांड घडले, ज्याने पंजाबसह संपूर्ण देशावर असा प्रभाव पाडला, ज्याचा डंका भारत आजही विसरलेला नाही. या घटनेत शांतताप्रिय आंदोलक जमावावर सातत्याने गोळीबार करण्यात आला. यामध्ये महिला आणि लहान मुलांसह हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. 


त्या दिवशी काय झाले?
अमृतसरमध्ये कर्फ्यू असूनही, 13 एप्रिल 1919 रोजी बैसाखीच्या दिवशी जालियनवाला बाग येथे ब्रिटीश दडपशाही कायद्याच्या निषेधार्थ तसेच दोन नेत्यांना अटक केल्याच्या निषेधार्थ हजारो लोकं शांततेने एकत्र जमले. पण इथे ब्रिटीश आर्मीची जनरल डायरची तुकडी या बागेत आली आणि त्यांनी लोकांवर कोणताही इशारा न देता गोळीबार केला आणि गोळ्या संपेपर्यंत हा गोळीबार सुरूच होता.


किती लोक मारले गेले?
या हत्याकांडात किती लोक मारले गेले यावर वाद सुरू आहे. या दरम्यान 10 ते 15 मिनिटे गोळीबार चालला, ज्यामध्ये 1650 राउंड फायर करण्यात आले. इंग्रजी सरकारच्या आकडेवारीनुसार केवळ 219 लोकांचा मृत्यू झाला. तर मदन मोहन मालवीय यांच्या समितीने हा आकडा 500 च्या वर असल्याचे सांगितले. परंतु चेंगराचेंगरी आणि विहिरीत उडी मारून झालेली मृत्यू यासह हा आकडा एक हजाराहून अधिक असल्याचे अनेकांचे मत आहे.


काय तात्काळ परिणाम झाला?
या घटनेने संपूर्ण देशात इंग्रजांविरुद्ध रोष निर्माण झाला होता. बर्‍याच मध्यमवर्गाचा इंग्रजांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला होता. रवींद्रनाथ टागोरांनी ब्रिटिश सरकारकडून नाइटहूडचा सन्मान परत केला. या घटनेचा तरुणांमध्ये एवढा रोष होता की, देशसेवेची बीजे भगतसिंगांसारख्या मोठ्या क्रांतिकारकांमध्ये रोवली गेली. गांधींच्या असहकार चळवळीला मोठ्या प्रमाणावर यश मिळू लागले.


स्वातंत्र्याचा पाया रचला
या हत्याकांडाने भारताच्या स्वातंत्र्याचा पाया घातला यात शंका नाही. गांधीजींच्या असहकार आंदोलनाला भारतीय जनतेच्या प्रत्येक वर्गाचा मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळाल्याने स्वातंत्र्य चळवळीला नवी दिशा मिळाली. जिथे नवीन लोक चळवळीत सामील झाले. नेत्यांचा आत्मविश्वास खूप वाढला 


सर्वत्र तरुणाईचा रोष
1920 च्या दशकात उत्तर भारतात झालेल्या सर्व क्रांतिकारी चळवळी आणि घटनांमागे जालियनवाला बागची घटना कारणीभूत आहे, ज्यामुळे रामप्रसाद बिस्मिल, चंद्रशेखर आझाद, भगतसिंग आपल्या क्रांतिकारी पक्षात अनेक लोकांना भरती करू शकले. त्याच वेळी काँग्रेसमधील जवाहरलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस यांच्यासारख्या नेत्यांनी पूर्ण स्वातंत्र्याच्या मागणीवर भर दिला.