नागपूर: विघ्नहर्ता बाप्पा यंदा 40 टक्क्यांनी महागला आहे. कोरोनाच्या दोन वर्षात गणरायाच्या उत्सवावर निर्बंध असल्याने या महागाईची झळ भाविकांना तेवढी बसली नाही. यंदा सरकारनेच उत्सवांवरील निर्बंध हटवून (Celebration) धूमधडाक्यात साजरा करण्यास परवानगी दिल्याने मंडळांमध्येही (Ganesh Mandal) उत्साहाचे वातावरण आहे. मात्र, मूर्ती तयार करण्यासाठी लागणारा कच्चा मालाच्या किंमती दुप्पटीने वाढल्याने गणरायाच्या मुर्त्यांवरही महागाईचे सावट पसरले आहे. एकीकडे देशभर महागाईवर (Inflation) आंदोलन व विरोधाचा सूर आवळला जात असतानाच खुद्द विघ्नहर्ताही महागाई घेऊनच येतो आहे, असे चित्र आहे.


गणरायाच्या आगमनाला एक दिवस उरला असल्याने बाजारपेठेला गणेशोत्सवाचे वेध लागले आहे. उपराजधानीतील प्रसिद्ध चितारओळीत गणेशमूर्ती साकारण्याची लगबग सुरू झाली आहे. चितारओळीत घरोघरी मूर्तींना साकारण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे चितारओळीत मातीच्या लहान मूर्ती तयार करण्यावर भर वाढला आहे. परंतु, यंदा मुर्त्यांच्या उंचीवरील निर्बंध हटविल्याने मोठया मुर्त्यांची मागणी अचानक वाढली आहे. मंडळांनी मूतींकारांकडे तशी ऑर्डर दिल्या आहेत. परंतु, वेळ कमी असल्याने मोठया मुतीं साकारणे मूतींकारालाही अवघड होत आहे. चितारओळीतील अनेक कुंटुंबे पिढ्यांपीढ्या या व्यवसायात आहेत. येथील अनेक मूर्तीकारांनी देशभर प्रसिद्धी मिळविली आहे. अशावेळी गणेशोत्सव जवळ आल्याने सर्वत्र लगबग दिसत आहे. मूतींसोबतच आरास व सजावटी वस्तूंची दुकानेही सजली आहेत.


किमती वाढल्या, दरही वाढणार


चितारओळीतील (Chitaroli) मूतींकार सुहास माहूरकर म्हणाले, मूर्ती तयार करण्यासाठी लागणार कच्च्या मालाच्या किमती दुपटीने वाढल्या आहेत. इंधन दरवाढीचा फटका मूर्तींच्या दरालाही बसला आहे. मातीचा दर प्रति ट्रक 4 हजारांहून थेट 10 हजारापर्यत वाढला आहे. तणस, ज्युट पोते, रंग, पेंट यांच्या किमती दुप्पट झाल्या. महागाईची झळ मूर्तीकारांच्या (sculptor) कुटुंबांना देखील बसली आहे. चितारओळीतून गणेशमूर्ती घेऊन जाणारे ग्राहक पारंपारिक आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून दुप्पट रक्कम वसुली करणे मूर्तीकारांसाठी कठीण आहे. त्यामुळे कमीत कमी किंमत वाढविण्याचा प्रयत्न आहे. 


अशी तयार होते मूर्ती 


मूर्ती तयार करण्यापूर्वी गवताचे तणस, पोते यापासून सर्वप्रथम मूर्तींचा ढाँचा तयार होतो. त्यानंतर नदी किनाऱ्यालगतच्या मातीने (River Soil) मूर्ती तयार केली जाते. त्यावर हलका रंगाईसाठी एक विशेष लेप लावला जातो. त्यानंतर रंगाई करून मूर्तीला सजविले जाते. सध्या चितारओळीत मूर्तीकारांचे काम 70%पर्यंत झाले आहे. 


300 वर्षांची परंपरा 


सुमारे 300 वर्षांपूर्वी राजे रघुजी भोसले यांनी भारतातील उत्कृष्ट कारागीर, मूर्तिकार चित्रकार, कास्टकार, शिल्पकार, रंगारी (पेंटर) यांना भारताच्या विविध भागातून नागपुरात आणले होते. त्यांना चितारओळी येथे स्वतःची घरे बांधून दिली. आज हीच चितारओळी नागपुरातील मूर्तिकारांची वसाहत म्हणून ओळखली जाते. राजवाड्यातील गणपती बाप्पांची मूर्ती देखील गेल्या नऊ ते दहा पिढ्यांपासून चितारओळीतच तयार केली जाते. सुरुवातीला सुमारे 500 मूर्तिकारांची घरे चितारओळीत होती. मात्र, आता केवळ शंभर मूर्तिकारांचे घर शिल्लक राहिले आहेत. त्यांचा पारंपारिक व्यवसाय या मूर्ती तयार करणे आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या


POP Ganesha Idol : पीओपी गणेशमूर्तींवरील बंदी कायम, राज्य सरकारची हायकोर्टात भूमिका


Blackmailing : आता नागपुरातील डॉक्टर 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात, व्हिडीओ कॉलची केली रेकॉर्डिंग