नागपूरः अलिकडे नागपुरात 'सेक्सटॉर्शन'च्या घटना वाढल्या असून नुकतेच एका उच्च शिक्षित डॉक्टरला अनोखळी तरुणीने 16 लाख रुपयांनी गंडविले आहे. बदनामी होईल या भितीपोटी डॉक्टरनेही (Doctor) काही दिवसांपर्यंत हे प्रकरण कोणालाही सांगितले नाही. मात्र नंतर पैशांसाठी ब्लॅकमेलिंग वाढल्याने डॉक्टरने (Nagpur) तक्रार दाखल केल्यावर हा प्रकार उघडकीस आला आहे.


चॅटिंगपासून व्हिडीओ कॉलपर्यंत


शहरातील वरिष्ठ डॉक्टरला काही महिन्यांपूर्वी मोबाईलवर एका नवीन क्रमांकावरुन व्हॉट्सअपवर (Whatsapp) मॅसेज आला. यावेळी डॉक्टरनेही त्या मॅसेजला प्रतिसाद देत चॅटिंग (Chatting) सुरु केली. त्या व्हॉट्सअपवर क्रमांकावर एका तरुणीची डीपी (Girl DP) होती. तिने मॅसेजच्या माध्यमातून डॉक्टरसोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. डॉक्टरनेही कुतुहलापोटी जवळीक साधली. चॅटिंगपुरती मर्यादीत जवळीक व्हिडीओ कॉलपर्यंत (Video Call) पोहोचली.


रेकॉर्डिंग करुन ब्लॅकमेल


तरुणीने डॉक्टरसोबत व्हिडीओ कॉलवर अश्लिल संभाषण (Adult Talk) सुरु केले आणि काही क्षणात तरुणी आणि डॉक्टर दोघेही निर्वस्त्र झाले. याच संधीचा फायदा घेत तरुणीने या कॉलची रेकॉर्डिंग सुरु केली. यानंतर तरुणीने या डॉक्टरला प्राथमिक 10 हजार रुपयांची मागणी केली. डॉक्टरला संशय आला. मात्र बदनामी होईल या भितीने या डॉक्टरने तरुणीच्या खात्यात 10 हजार रुपये पाठवले. रक्कम फक्त दहा हजार असल्याने डॉक्टरने याबाबत कुठेही चर्चा केली नाही.


पैसे मिळाल्याने वाढले मनोबल


डॉक्टरने एका झटक्यात दहा हजार रुपये पाठविल्याने ब्लॅकमेलिंग करणाऱ्यांचे मनोबल वाढले आणि मोठी खंडणी मागण्याची योजना त्यांनी आखली. काही दिवसानंतर जवळपास 6 लाख रुपये मागितले. डॉक्टरने देण्यास नकार दिल्यावर काढलेले स्क्रिनशॉर्ट (Screenshort) आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली. डॉक्टरने ही रक्कम देऊन प्रकरण मिटविण्याची विनंती केल्यावर डॉक्टरने सहा लाख रुपये पाठवले. त्यानंतर पुन्हा एका साथीदाराने डॉक्टरांना फोन करुन पाच लाख रुपयांची मागणी केली. घरी कार्यक्रम असल्याने बदनामी नको म्हणून त्यालादेखील पैसे दिले.


दिल्लीतून पोलिसांच्या नावाने फोन


यानंतर दोन दिवसांनी दिल्ली येथील गुन्हेशाखेचा (Delhi Crime Branch officer) अधिकारी बोलत असल्याची बतावणी करत तिसऱ्या व्यक्तीने अटकेची भीती दाखविली. दहशतीत असलेल्या डॉक्टरने त्याच्या खात्यातदेखील 5 लाख वळते केले. तीन गुन्हेगारांनी मिळून डॉक्टरांकडून 16 लाख रुपये उकळले. अखेर संबंधित डॉक्टरने प्रतापनगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.


यापूर्वीही अनेकांना गंडा


शहरात काही दिवसांपूर्वी एका उद्योजकाला (Businessman) अशाच प्रकारे ब्लॅकमेल करण्यात आले होते. तसेच शहरातील काही पत्रकारांनाही 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून त्यांचे व्हिडीओ बनविण्यात आले होते. मात्र त्यांनी सायबर एक्स्पर्टशी चर्चा केल्याने फसवणूक टळली. याशिवाय शहरातील प्रतिष्ठितांनी तर चक्क आपले मोबाईल नंबरच बदलले आहे. यापैकी अनेकांनी लाखोंरुपये ब्लॅकमेलरला दिल्याची माहिती आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या


Nagpur News : 'आपले गुरूजी' चा फोटो झळकणार वर्गात, राज्य सरकारच्या निर्णयाचा विरोध


RTMNU : नागपूर विद्यापीठातून 'एमकेसीएल' आऊट, कुलगुरूंच्या भूमिकेची उच्चस्तरीय चौकशी