Indian Science Congress Nagpur : ऊसापासून गुळ तयार करताना मोठ्या प्रमाणात शेती आधारीत इंधन जाळण्यात येते. गुळ तयार करताना शेतकऱ्यांच्या माध्यमातून भट्टीद्वारे त्यावर प्रक्रिया करण्यात येते. या प्रक्रियेत तयार करण्यात येत असलेल्या भट्टीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. मात्र, केंद्राच्या कौन्सिल ऑफ सायटिफिक अॅन्ड इडस्ट्रीअल रिसर्चच्या (Centre's Council of Scientific and Industrial Research) वतीने तयार करण्यात आलेल्या गुळभट्टीच्या तंत्रज्ञानातून 80 टक्के प्रदुषण कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच यामध्ये गुळ उत्पादकांच्या वेळेचीही बचत होणार आहे.
ऊस उत्पादक (Sugarcane farmers) शेतकऱ्यांच्या माध्यमातून असलेल्या उसापासून गुळ तयार करण्यासाठी गुळभट्टीचा वापर करण्यात येतो. हे तंत्रज्ञान पारंपरिक असल्याने त्यासाठी शेतकऱ्यांना अधिक कोई लागते. त्यामुळे त्याचा खर्च वाढतो. विशेष म्हणजे गुळ तयार करीत असताना त्यातून मोठ्या प्रमाणात धुर निघत असतो. त्यामुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात कार्बनडायऑक्साईड वातावरणात पसरतो. त्यामुळे राष्ट्रीय हरित लवादाच्या निकषानुसार हा धूर मोठ्या प्रमाणात येत असल्याने अशा प्रकारच्या गुळभट्टींवर निर्बंध आणण्याचे निर्देशही देण्यात आले आहे. या प्रकाराने अनेक गुळभट्टी बंद होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे केंद्राच्या कौन्सिल ऑफ सायटिफिक अॅन्ड इडस्ट्रीअल रिसर्चच्या वतीने गुळभट्टीला तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अपग्रेड केले आहे. त्यामुळे त्यातून होणारे प्रदूषण 80 टक्क्यावर कमी करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, गुळभट्टीसाठी लागणारी कोई (शेतीमधील इंधन) 15 टक्के कमी लागणार आहे. त्यामुळे इंधनाचा जास्तीत जास्त वापर करता येणार आहे.
गुळाची गुणवत्ता वाढणार
साधारणतः जुन्या गुळभट्टीमध्ये गुळाच्या गुणवत्तेवर मोठा परिणाम होतो. मात्र, नव्या तत्रज्ञानाच्या माध्यमातून विकसित करण्यात आलेली गुळभट्टी यामध्ये इंधनाचे सातत्य आणि कोईच्या प्रमाणशिर वापर असल्याने गुळाची गुणवत्ता वाढणार असल्याचे संशोधक जी.डी. ठाकरे यांनी सांगितले.
प्लास्टिकपासून डिझेलची निर्मिती
प्रदर्शनीत प्लॅस्टिक कचऱ्यापासून इंधन निर्मिती करणारा मॉडेलही ठेवण्यात आला आहे. यात कचऱ्यातील प्लास्टिक मिशनद्वारे स्वच्छ धूवून त्यानंतर त्यांचे बारीक पार्टीकल तयार करण्यात येतात. यानंतर त्यावर प्रक्रिया करुन त्यातून गॅसोलिन, डिझेल आणि एरोमॅटिक तयार करण्यात येते. या इंधनाचा वापर करुन जनरेटर, गाड्या, वाहनांमध्ये वापरता येते. या प्रकल्पामुळे प्लास्टिकचा कचरा कमी करण्यास मदत होईल. तसेच प्रदूषण नियंत्रणासाठीही याची मदत होणार आहे.
ही बातमी देखील वाचा...
चांद्रयान- 3 ची तयारी पूर्ण, जून-जुलैमध्ये लॉंचिंग; इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांची माहिती
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI