नागपूरः नागपुराच्या फुटाळा तलावात साकारला गेलेला संगीत कारंजा बघण्यासाठी ट्रायल शो (Trial Show) मध्येच चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता हे संगीत कारंजे सर्वसामान्य नागरिकांसाठी ऑक्टोबरमध्ये मोकळे होईल. मात्र लोकार्पणापूर्वी येतील राजकीय पर्यटन जोरात सुरु आहे.


राज्यातील सत्तांतरानंतर विदर्भात मोठ्या प्रमाणावर नेते हजेरी लावत आहे. नुकतेच मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीही  म्युझिकल फाऊंन्टेन बघून हे साकारणाऱ्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या व्हिजनची स्तुती केली. याशिवाय शहरात येणारे जवळपास प्रत्येक नेता येथे भेट देत आहे. दुसरीकडे 'ट्रायल शो' साठीच्या पासेसही तयार करण्यात आल्या असून राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून नागरिकांना पासेस देऊन आपला जनसंपर्क वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. जगातील सर्वात उंच इमारत दुबईतील बुर्ज खलिफाला अगदी लागून असलेल्या जगप्रसिद्ध म्युझीकल फाऊंन्टेला (Dubai Musical Fountain) बघण्यासाठी दरवषीं जगभरातील लाखो पर्यटक पोहोचतात. याच धरतीवर याची निर्मिती करण्यात आली आहे. 


मुख्यमंत्र्यांची राहणार हजेरी


पुढील महिन्यात शहरातील काही प्रकल्पांचे लोकार्पण करण्याचा नासुप्र व इतर संस्थांचा विचार आहे. या प्रकल्पांसोबतच फुटाळयातील संगीत कारंजे प्रकल्पाचेही लोकार्पण होईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांच्याशिवाय प्रकल्पासाठी विशेष परिश्रम घेणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची वेळ ठरवूनच लोकार्पण निश्चीत करण्यात येणार आहे. मात्र, ऑक्टोबरमध्ये लोकार्पण करणे निश्चित झाले आहे. नुकत्याच झालेल्या ट्रायल शो मधून उपराजधानीचा इतिहास, कॉमेन्ट्री, संगीत आणि कारंजे आदी तसेच पाणी वरून खाली पडतानाच्या वेळेचा फरक पडला होता. तो आता योग्य करण्यात आला आहे.


फ्रांन्स क्रिस्टल समुहाचे 94 फाऊंन्टन



  • आवाज, पाणी आणि कारंजे आदींचे सिंन्क्रोनायझेशनचे काम पूर्ण झाले आहे.  

  • संगीत कारंजाचा आनंद घेण्यासाठी 4 हजारांच्या बसण्याची सोय

  • 35 मिनिटात चार टप्प्यात सादरीकरण होईल. फ्रांन्सचा क्रिस्टल समुहाने 94 फाऊंन्टेन लावले

  • फाऊंन्टेनची लांबी 180 मीटर आहे. हे सर्वात लांब फाऊंन्टेनचा दावा. 50 मीटर उंचीपर्यंत उडणारे कारंजे


विश्वस्त मंडळ ठरवणार तिकीट दर


नासुप्रने कंत्राटदाराच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावरचा हा संगीत कारंजा तयार केला. आता तांत्रिक अडचण राहणार नाही. इंग्रजीत अमिताभ बच्चन, हिंदीत गुलजार आणि मराठीत नाना पाटेकर यांचा व्हॉईस ओव्हर असेल. ए.आर. रहमान यांचे संगीत. ऑस्कर विजेता साऊंड डिझाईनर रेसूल पोकुट्टी यांचे ध्वनी सिंन्क्रोनाईझेशन आहे. नागपूरसह शहराबाहेरील नागरिकही या कारंजाचा आनंद घेऊ शकतील. यासाठी अगदी माफक तिकिट दर असेल. नासुप्रचे विश्वस्त मंडळ दर लवकरच ठरवणार असल्याचे नागपूर सुधार प्रन्यासकडून सांगण्यात आले आहे.


असा आहे प्रकल्प



  • 12 माळयाची इमारत, 1100वाहन पाकिंग व्यवस्था

  • इमारतीत फुडपार्क, मॉल, 11 व्या माळयावर मल्टीफ्लेक्स

  • 12व्या माळयावर फिरते रेस्टॉरेंट

  • 2 मेगावॅट वीजेची खपत

  • बॉटनीकल उद्यानाचा किनाऱ्यावर चौपाटीचा प्रस्ताव


इतर महत्त्वाच्या बातम्या


Nagpur : ...तर पतीलाही पोटगी मागण्याच्या अधिकार, हायकोर्टाचे महत्त्वाचे निरीक्षण


नागपूर मनपा आयुक्त 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये, मालमत्ता कर विभागाचे पाच कर्मचारी निलंबित