Astronomy News : डिसेंबर महिन्यात 2 महत्वाचे उल्कावर्षाव (Meteor Shower) आणि 1 धुमकेतू (Comet)- ग्रह (Planet) चंद्र (Moon) युती (Comet Planet Moon Conjunction) पाहण्याची संधी खगोलप्रेमीं, खगोल निरीक्षकांना मिळणार आहे. 2023 वर्षांतील शेवटच्या खगोलीय घटना राहणार असून खगोल निरीक्षकांना सुवर्ण संधी ठरणार आहे. या खगोलीय घटनांना उघड्या  डोळ्यांनी, तर काही घटना दुर्बिणीने पाहता येणार आहे. त्यामुळे या सुवर्णसंधीचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन खगोल अभ्यासक करत आहेत.  


अंतराळात असंख्य खगोलीय घटना घडत असतात. या सर्व घटनांचा मानवी जीवनावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या काहीना-काही फरक पडत असतो. मानवीवस्ती पासून लक्षावधी अंतरावर घडणाऱ्या अशा घटनांकडे जगभरातील शास्त्रज्ञ लक्ष ठेवून असतात. अशा काही घटनांबाबत सर्वसामान्यांना देखील कायम कुतूहल राहिले आहे. आशांच काही खगोलीय घटना या वर्षाच्या अखेरीस अनुभवता येणार आहे. 


23 डिसेंबर ला उर्सीड उल्कावर्षाव


उर्सीड उल्कावर्षाव हा 17-23 डिसेंबर दरम्यान बघता येणार आहे. मात्र हा उल्कावर्षाव सर्वाधिक उल्का 23 डिसेंबर ला दिसेल. उर्सा (Ursa Miner) मायनर तारा समूहात हा उल्कावर्षाव रात्री 9 ते 12 वाजेपर्यंत पूर्व-उत्तर दिशेला दिसेल. परंतु जास्तीत जास्त तासी 20  उल्का दिसण्याची शक्यता आहे. हा उल्कावर्षाव 8P/Tattle ह्या धूमकेतू मुळे हा वर्षाव दिसतो.अवकाशातील दगड जेव्हा पृथ्वी च्या वातावरणात प्रवेश करतात तेव्हा घर्षणाने ते तापतात आणि एका रेषेत चकाकतांना दिसतात. त्यांना आपण तारा तुटणे असे संबोधित करतो. ह्यातील बहुतेक दगड राख होऊन जमिनीवर पडतात किंवा कधी उल्का रूपाने जमिनीवर आदळतात, अशी माहिती स्काय वॉच गृप इंडियाचे अध्यक्ष प्रा.सुरेश चोपणे यांनी दिली. 


25-28 डिसेंबरला धूमकेतू पाहण्याची संधी


संपूर्ण डिसेंबर महिन्यात 62P/Tsuchinshan हा धुमकेतू पूर्वेला पहाटेच्या आकाशात लिओ (Leo) तारा समूहात दिसणार आहे. परंतु हा धुमकेतू 25 डिसेंबरला पृथ्वीच्या सर्वाधिक जवळ (1.27 अस्ट्रोनॉमिकल युनीट) अंतरावर असणार आहे.  28 डिसेंबरला तो सर्वाधिक तेजस्वी दिसणार आहे. ह्याची तीव्रता 8 इतकी असेल. तसेच रात्री 2 नंतर पहाटे सुर्यास्ता पर्यंत हा धुमकेतू द्विनेत्रीं आणि दुर्बिणीने पाहता येईल. मात्र तो साध्या डोळ्याने बघता येणार नसल्याचे देखील प्रा.सुरेश चोपणे म्हणाले. 


22 डिसेंबर सर्वात लहान दिवस


22 डिसेंबर हा विंटर सोलेस्टिस म्हणून मानल्या जातो. हा दिवस वर्षातील सर्वात लहान दिवस आणि  मोठी रात्र असतो. ह्या वर्षी हा योग 22 डिसेंबरच्या रात्री 8.54 वाजता असेल. या सर्व खगोलीय घटना नागरिक,अभ्यासक आणि निरीक्षकांनी अवश्य पहाव्या. असे आवाहान स्काय वॉच गृप,इंडिया ह्या खगोल संस्थेच्या माध्यमातून करण्यात येत आहे.


संबंधित बातम्या