नागपूर : नक्षलवाद्यांशी (Naxalite) संबंध ठेवून त्यांच्यासाठी काम करण्याचा आरोप असलेल्या आणि गडचिरोली सत्र न्यायालयाकडून जन्मठेपेची शिक्षा झालेल्या प्राध्यापक जी.एन. साईबाबासह (G N Saibaba) त्यांच्या चार सहकाऱ्यांविरोधात आज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात (Nagpur Bench of Bombay High Court) निर्णय सुनावल्या जाण्याची शक्यता आहे. 


जी. एन. साईबाबा आणि त्यांच्या चार सहकाऱ्यांना गडचिरोली सत्र न्यायालयाने 7 मार्च 2017 रोजी नक्षलवादी कारवाईच्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्याविरोधात जी.एन. साईबाबा आणि इतर सहकाऱ्यांनी नागपूर खंडपीठात अपील दाखल करत सत्र न्यायालयाचे निर्णयाला आव्हान दिले होते. नागपूर खंडपीठात 7 सप्टेंबर 2023 रोजी या प्रकरणाची अंतिम सुनावणी होऊन निर्णय राखीव ठेवण्यात आला होता. नागपूर खंडपीठ आज या संदर्भात निर्णय सुनावण्याची दाट शक्यता आहे. 


अन् निकालाला स्थगिती देण्याबाबत राज्य सरकराने याचिका दाखल केली 


मार्च 2017 मध्ये गडचिरोली न्यायालयाने साईबाबासह एक पत्रकार आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील एका विद्यार्थ्यांसह एकाला माओवाद्यांशी संबंध, देशाविरोधात युद्ध पुकारण्याच्या कटात सामिल असल्या प्रकरणी दोषी ठरवले होते. मात्र, पुढे मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात या निर्णयाला आव्हान देण्यात आले. दरम्यान, सप्टेंबर 2022 पासून त्या याचिकेवर नियमित सुनावणी झाली, आणि 29 सप्टेंबर रोजी सुनावणी पूर्ण होऊन खंडपीठाने निकाल राखून ठेवला. त्यानंतर 14 ऑक्टोबर 2022 रोजी हायकोर्टाने निकाल सुनावला. ज्यात साईबाबा यांच्यासह अन्य पाच आरोपीही दोषमुक्त असल्याचे सांगत सर्वांची तातडीने सुटका करण्याचे निर्देश दिले. मात्र, राज्य दुसऱ्याच दिवशी या निकालाला स्थगिती देण्याबाबत राज्य सरकराने याचिका दाखल केली होती. 


काय आहे प्रकरण?


दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक असलेले जी. एन. साईबाबा यांना वर्ष 2013 मध्ये नक्षलवाद्यांच्या दक्षिण गडचिरोली कमांडर नर्मदाअक्काला भेटायला आलेल्या काहीजणांना पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर प्राध्यापक जी.एन. साईबाबा हा नक्षलवाद्यांशी संपर्कात असल्याचे पुरावे पोलिसांना मिळाले. गडचिरोलीमध्ये काही जणांच्या अटकेनंतर पोलिसांनी दिल्लीत साईबाबाच्या घरावरछापेमारी करत झडती घेतली. त्यात अनेक डिजिटल पुरावे मिळून आल्याचा दावा करण्यात आला. त्यानंतर साईबाबाला पोलिसांनी अटक केली होती.


दरम्यान, साईबाबाच्या घरातून मिळालेले साहित्य आणि डिजिटल पुरावांच्या आधारे पोलिसांनी साईबाबा जंगलातील नक्षलवादी तसेच शहरी भागातील नक्षल समर्थक यांच्यामध्ये समन्वयाचे काम करत असल्याचा आरोप ठेवला होता. एवढेच नाही तर तो परदेशामध्येही नक्षलवाद्यांसाठी सहानुभूती आणि समर्थक जोडण्याचे काम करत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे साईबाबा विरोधात युएपीए अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता.


अन् साईबाबा चर्चेत आले...


जी एन साईबाबा 2013 पर्यंत हे नाव दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक म्हणून परिचयाचे होते. मात्र, 2013 मध्ये नक्षलवाद्यांच्या दक्षिण गडचिरोलीची कमांडर नर्मदाअक्काला भेटायला आलेल्या एका व्यक्तीच्या अटकेनंतर गडचिरोली पोलिसांना तपासात काही लिंक्स मिळाल्या, त्या आधारावर पुढे गडचिरोलीमध्ये काही जणांना अटक झाली. पुढे गडचिरोली पोलिसांचे तपास दिल्लीत जी एन साईबाबा पर्यंत पोहोचले. जेव्हा पोलिसांनी साईबाबाच्या घराची झडती घेतली, तेव्हा पोलिसांनी अनेक डिजिटल पुरावे, आक्षेपार्ह साहित्य मिळाल्याचा दावा करत जी एन साईबाबाला अटक करण्यात आली. तपासातील पुराव्यांच्या आधारे जी एन साईबाबावर जंगलातील नक्षलवादी तसेच शहरी भागातील नक्षल समर्थक यांच्यामध्ये समन्वयाचा काम करत असल्याचा, देशा विरोधात लढा पुकारल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. 7 मार्च 2017 रोजी गडचिरोली जिल्हा व सत्र न्यायालयाने यूएपीए म्हणजेच बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्या अंतर्गत साईबाबा सह इतर पाच जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्याच शिक्षेला साईबाबा व त्याच्या सहकाऱ्यांनी उच्च न्यायालयातील नागपूर खंडपीठात आवाहन दिले होते.


इतर महत्वाच्या बातम्या : 


Vijay Wadettiwar on Samruddhi Mahamarg : मलिदा खाल्ल्यामुळेच समृद्धीला खड्डे पडले, कंत्राट देताना करोडो रुपये सत्ताधाऱ्यांनी खिशात घातले : विजय वडेट्टीवार