नागपूर: विद्यापीठाच्या पदव्युत्तर प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण झाली असताना इंजीनीअरींग (Engineering) प्रवेश प्रक्रिय रखडली आहे. आतापर्यंत नोंदणीही सुरू झाली नाही. सीईटीचा (CET) निकाल 15 सप्टेंबरपर्यंत लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने प्रवेशप्रक्रिया प्रभावित होत असल्याचे चित्र आहे. यामुळे अनेक महाविद्यालयांना याचा फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
 
विद्यापीठात पदवी प्रवेश (Graduate Admission) होऊन दैनंदिन कॉलेजही सुरू झाले. इतर राज्यातील विद्यापीठातील (other University in the state admission completed) प्रवेशही पूर्ण झाले. मात्र, इंजीनिअरींगची प्रक्रिया अडकली आहे. सीईटीची परीक्षा झाल्यानंतर आता कुठे उत्तरपत्रिकांची तपासणी सुरू झाली. परंतु, अद्यापही निकालाची घोषणा झाली नाही. 15 सप्टेंबरपर्यंत निकाल लागेल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. 


हिवाळी परीक्षेमुळे नव्हता पुरेसा वेळ


त्यानंतर पुढील15-20 दिवसानंतर नोंदणीप्रक्रियेस (Registration) सुरूवात होईल. त्यानंतर आक्षेपांची नोंद होईल. त्यानंतरच मेरीट यादी (Merit List) लागेल. ऑक्टोबरच्या पहिल्या टप्प्यात प्रवेशाचा विचार केल्यास नोव्हेंबरअखरेपर्यंत सर्व प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईल. तंत्रशिक्षण विभागातफें इंजीनीअरींग प्रवेश प्रक्रिया केली जाते. मात्र, परीक्ष ही विद्यापीठ प्रशासनातर्फे घेतली जाते. फेब्रुवारी-मार्चमध्ये विद्यापीठाने हिवाळी परीक्षा (Winter Exam) घेतली. त्यामुळे अंतीम टप्प्यात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांजवळ अभ्यासासाठीही पुरेसा वेळ नव्हता. निकाल लांबणार असल्याने याचा थेट परिणाम प्रवेशप्रक्रियेवर (Admission Process) पडेल. 


पंधरा हजार जागा उपलब्ध


विभागात इंजीनिअरींगंच्या पहिल्या वर्गासाठी 15000जागा उपलब्ध आहे. उलटपक्षी, सीईटी परीक्षेत सहभागी परीक्षार्थींची संख्या 20हजाराच्या (examinees) आसपास आहे. यातील बहुतांश विद्यार्थ्यांनी इतर पारंपारिक अभ्यासक्रमात प्रवेशही घेतला (Traditional Courses) आहे. तर, काहींनी विद्यापीठात प्रवेश घेतला. काहींनी तर पॉलिटेक्नीकमध्ये प्रवेश घेऊन मोकळे झाले. सीईटीसोबतच नीटचा (cet neet) निकालही अपेक्षीत आहे. सोबतच आयआयटी (IIT) व एनआयटीमध्येह (NIT) प्रवेश होईल. त्यामुळे राज्यातील इंजीनिअरींग कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांच्या संख्येचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. दरवषीं इंजिनीअरींगच्या जागा रिक्त राहतात. प्रक्रिया उशीराने होत असल्याने अनेक विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतिक्षेत असतात. अनेक विद्यार्थी पारंपारीक अभ्यासक्रमात डमी प्रवेशही घेऊन ठेवत असतात.


इतर महत्त्वाच्या बातम्या


सोळा दिव्यांसह बंबाळ आरती, गौरी विसर्जनाच्या आदल्या दिवशी मयूरेश्वर गणेशाची काढली जाते दृष्ट, बीडमधील अनोखी परंपरा


Nagpur News : कच्च्या मालावर जीएसटी तर तयार पुस्तक करमुक्त, सर्व पुस्तकांच्या किमती 50% वाढणार!


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI