नागपूर : मागिल दोन आठवड्यांपासून गायब असलेल्या वरुणराजाने (Monsoon) रविवारी, ता. 4 सप्टेंबर रोजी पुन्हा विदर्भात धडाक्यात एंट्री केली. रविवारी सकाळच्या सुमारास शहरातील (Rain in City) बहुतांश भागांत जोरदार सरी बरसल्या. संततधार पावसामुळे दैनंदिन जनजीवन विस्कळीत झाले असले तरी, नागपूरकरांना ऊन व उकाड्यापासून दिलासाही मिळाला. विदर्भात (Monsoon active in Vidarbha) आणखी काही दिवस पावसाळी वातावरण राहणार असल्याचे प्रादेशिक हवामान विभागाचे म्हणणे आहे.


बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे सध्या मध्य भारतावर ढगांची दाटी झाली आहे. त्याच्या प्रभावामुळे संपूर्ण विदर्भात पावसाचा जोर वाढला आहे. उपराजधानीत सकाळपासून पावसाला सुरवात झाली. तास दीड तास संततधार आल्याल्यानंतर काही भागांत 15 ते 20 मिनिटे मुसळधार (Heavy Rainfall) बरसला. दुपारी एक-दीड वाजेपर्यंत पावसाची रिपरिप सुरूच होती. पावसामुळे सखल भागांमध्ये जागोजागी डबके (small ponds on roads) साचले होते. दैनंदिन जनजीवन विस्कळीत झाले होते. बऱ्याच दिवसांनंतर नागरिकांना छत्र्या व रेनकोटही (Rain coat) बाहेर पडले. संततधारेमुळे नागपूरकरांना दुपारपर्यंत घराबाहेर पडता आले नाही.


कमाल तापमानातही घट, चटक्यांपासून दिलासा


पाऊस व ढगाळ वातावरणामुळे कमाल तापमानातही घट होऊन वातावरण दिलासादायक बनले. त्यामुळे उन्हाचे चटके व असह्य उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. शनिवारपर्यंत नागपूरचा (Nagpur Temperature) पारा 35 अंश सेल्सिअसच्या आसपास होता. त्यामुळे अंगातून घामाच्या धारा वाहात होत्या. पंखे गरगरा फिरू लागले होते. भयंकर उकाड्यामुळे एसीदेखील सुरू करावे लागले होते. शहरात सायंकाळी साडेपाचपर्यंत 26.2 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. ग्रामीण भागांसह विदर्भातील इतरही जिल्ह्यांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावल्याची माहिती आहे.


अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस




 



राज्यात काही ठिकाणी पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. मुंबईसह ठाणे, नवी मुंबई परिसरात चांगलाच पाऊस झाला आहे. त्याचबरोबर औरंगाबाद जिल्ह्यातही अनेक ठिकाणी जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. तसेच जालना जिल्ह्यातही काही ठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. अंबड तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्यानं झाडे उन्मळून पडली आहेत. त्याचबरोबर यवतमाळ जिल्ह्यातही आज पावसानं हजेरी लावली आहे. तसेतच वर्धा जिल्ह्यात काही ठिकाणी चांगला पाऊस पडला आहे. तसेच नागपुरात अनेक दिवसांच्या खंडानंतर आज पावसानं चांगली हजेरी लावली आहे. लातूर शहर आणि परिसरामध्ये मध्यरात्रीच्या नंतर जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. ढगाच्या गडगडासह जोरदार पावसाने हजेरी लावली. काल दिवसभर वातावरणात प्रचंड उकडा जाणवत होता. मात्र, मध्यरात्रीनंतर पडलेल्या पावसामुळं वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. पावसाने वीस ते पंचवीस दिवसापेक्षा जास्त उघडीप दिली होती. दरम्यान, आज विदर्भात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच पालघर, नाशिकचा घाट भाग, अहमदनगर, रायगड या जिल्ह्यातही पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या


Love Birds : लग्नासाठी अल्पवयीन प्रियकर घरातून पळाले, टीटीईच्या मदतीने जीआरपीकडे सुपूर्द


Nagpur News : कच्च्या मालावर जीएसटी तर तयार पुस्तक करमुक्त, सर्व पुस्तकांच्या किमती 50% वाढणार!