नागपूर : कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. लॉकडाऊनमुळे सध्या नेते मंडळींचाही घरीच मुक्काम आहे. याच वेळात काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी काही वेळ आपल्या किचनमध्ये घालवलाय. आपल्या मुलांना स्वयंपाकाचे धडे देत विदर्भातील प्रसिद्ध बेसन आणि खिचडी तयार केली. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग पाळणे फार महत्वाचे आहे. यापूर्वी नागपूरचे असलेले गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घरात स्वयंपाक घरात घरी कसा वेळ घालवता येईल, हे सांगितले होते.


आशिष देशमुख यांनी आपल्या स्वयंपाकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकला आहे. "आवडणारे बेसन आज आपण बनवतोय, माझा मुलगा ह्रिदय आणि जिग्गर यांच्यासोबत मी बनवत" असल्याचे आशिष देशमुख यांनी व्हिडीओत म्हटले आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून सोशल डिस्टन्सिंग फार महत्त्वाचे आहे, पण असं असतानाही भाजीबाजारात लोकांची गर्दी पहायला मिळते. त्यामुळे काही काळ भाजी खरेदीसाठी न जाता, बेसना सारखे पदार्थ तयार करुन, लोकांनी भाजीपाल्याला पर्याय द्यावा आणि बाहेरील गर्दी टाळावी. हाच संदेश यातून आशिष देशमुख यांनी देण्याचा प्रयत्न केला.





coronavirus | राज्यातला कोरोनाग्रस्तांचा आकडा 186 वर


सोशल डिस्टन्सिंग
कोरोना हा आजार संसर्गजन्य आहे. मात्र, या विषाणूचा हवेतून प्रसार होत नाही. या विषाणूचा प्रादुर्भाव हा कोरोनाबाधित व्यक्तीच्या सहवासातूनच होतो. यातपण तो व्यक्ती शिंकला किंवा खोकला तर त्यांच्या शिंकेवाटे हे विषाणू आपल्यापर्यंत पोहचतात. हस्तांदोलनातूनही याचा संसर्ग होण्याची शक्यता असते. तर, कोरोना विषाणू हा पृष्ठभावरही काही काळ जीवंत असतो. त्यामुळे त्या वस्तूच्या स्पर्शातूनही हा आजार आपल्यापर्यंत पोहचू शकतो. अद्यापतरी हा आजारावर कोणतेही औषध बाजारात उपलब्ध नाही. त्यामुळे या आजारापासून दूर राहणे, हा एकमेव उपाय आहे.


Coronavirus | कोरोना व्हायरसच्या लढ्यात भाजपचा मदतीसाठी मास्टर प्लॅन तयार


राज्यातला कोरोनाग्रस्तांचा आकडा 186 वर
राज्यासह देशभरात कोरोना व्हायरसने गुणाकार करण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 186 वर पोहोचली आहे. गुरुवारी (26 मार्च) दिवसभरात मुंबईचे 22 जण , पुण्याचे 4, नागपूरचे 2, जळगावचा 1 आहे. तर 4 रूग्ण पालघर, वसई, विरार आणि नवी मुंबई परिसरतील आहे. तर नागपूर, सांगली जिलह्यातील इस्लामपूरमधील रुग्णांना समूह संसर्गातून कोरोना झाल्याची शक्यता आहे. त्यामुळे इस्लामपूर शहर सील करण्यात आले आहे. देशातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत 935 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. 24 तासात 149 नवे रूग्ण आढळले असून आतापर्यंत 19 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोनाबाधितांची संख्या सर्वात जास्त केरळमध्ये आहे. त्यानंतर महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो. भारत सध्या दुसऱ्या स्टेजला आहे.


Coronavirus | पत्नीच्या प्रेमापोटी आजोबांनी केला 70 किलोमीटर घोड्यावरून प्रवास