नागपूर : जिल्हाधिकारी, अधिनस्त क्षेत्रीय स्तरावरील उपविभागीय कार्यालय व तहसिल कार्यालयामध्ये कार्यालयीन अधिकारी व कर्मचाऱ्याची उपस्थिती नियंत्रित (Biometric Attendance) करण्याच्या दृष्टीने बायोमेट्रीक प्रणाली 1 सप्टेंबर पासून कार्यान्वित करण्यात आली आहे. सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी बायोमेट्रीक प्रणालीद्वारे (government offices in nagpur) उपस्थिती नोंदविणे बंधनकारक आहे. तसेच संबंधित सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी बायोमेट्रीक प्रणालीवर नोंदविण्यात आलेल्या उपस्थिती अहवालाचे आधारे वेतन अदा करण्याची कार्यवाही सुरु करावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले आहेत.


बायोमेट्रीक प्रणालीवर नोंदविण्यात आलेल्या उपस्थिती अहवाल विचारात न घेता वेतन अदा करण्यात आल्याची बाब निदर्शनास आल्यास संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांची जबाबदारी निश्चित करण्यात येईल, असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी, एन. आर.सी. व ई-डीस्ट्रीक्ट प्रोजेक्ट मॅनेजर, महा आयटी यांनी बायोमेट्रीक प्रणालीचा दैनंदिन उपस्थित अहवाल दररोज सकाळी 10.15 वाजेपर्यंत सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.


RTMNU Fees Hike : विद्यार्थी संघटनांच्या विरोधानंतर अखेर 20% शुल्कवाढ मागे, विद्यापीठाचा निर्णय


प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी पेंशन अदालत


नागपूर :  जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी, व अधिनस्त क्षेत्रीय स्तरावरील उपविभागीय कार्यालय व तहसिल कार्यालयातील  सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी व कर्मचारी यांचे प्रलंबित सेवानिवृत्ती (pension court) प्रकरणाबाबत  व त्यांचे सेवानिवृत्ती विषयक लाभांबाबतच्या  तक्रारीचे निराकरण करण्यासाठी पेंशन अदालतीचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी सकाळी 11 ते 12 वाजता करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालय व अधिनस्त क्षेत्रीय स्तरावरील कार्यालय व तहसिल कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी सेवाविषयक लाभाबाबत काही तक्रारी असल्यास  पेंशन अदालतीमध्ये उपस्थित रहावे.


Nagpur Politics : उपराजधानीत मनसे देणार शिवसेनेला पर्याय! 13 ला राज ठाकरे नागपुरात; नव्या युतीचे संकेत


सोमवारी सोडवणार नागरिकांच्या तक्रारी, 5  सप्टेंबर रोजी लोकशाही दिन


नागपूर : जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन सोमवार, 5 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बचत भवन येथे दुपारी 1 ते 2 या वेळेत करण्यात येणार आहे. लोकशाही दिनाकरीता नागरिकांकडून 5 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत तक्रार व निवेदन अर्ज स्विकारण्यात येणार आहेत. तक्रार अर्ज दाखल केलेल्या नागरिकांना व्यक्तीश: लोकशाही दिनात सहभागी व्हावे लागेल. तक्रार अर्ज व निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे आसावे.  तालुकास्तरीय लोकशाही दिनातील तक्रार अर्जावर एक महिन्यात कार्यवाही न झाल्यास जिल्हास्तरीय लोकशाही  दिनात तक्रार अर्ज सादर करावा. तालुका लोकशाही दिनातील टोकन क्रमांक नमूद करणे अनिवार्य आहे. नागपूर महानगरपालिका (NMC) व नागपूर सुधार प्रन्यास (NIT) यांचे मार्फत आयुक्त नागपूर महानगरपालिका व सभापती नागपूर सुधार प्रन्यास यांचे अध्यक्षतेखाली स्वतंत्र्यपणे लोकशाही दिनाचे आयोजन त्यांचे कार्यालयात करण्यात येत असल्यामुळे सदर कार्यालयाशी संबंधित तक्रारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनात दाखल न करता संबंधित कार्यालयात आयोजित  होत असलेल्या लोकशाही दिनात सादर करण्यात याव्यात. लोकशाही दिनाच्या तक्रारीचे निकष याप्रमाणे आहेत. अर्ज विहित नमुन्यात असावा. न्यायप्रविष्ठ प्रकरणे, विहित नमुन्यात नसणारे व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती न जोडलेला अर्ज, नोकरीविषयक, सेवा विषयक, आस्थापना विषयक बाबी तसेच तक्रार व निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे नसेल व कार्यालय प्रमुखांनी अंतिम उत्तरे दिलेले प्रकरणे असेल अर्ज स्विकारले जाणार नाहीत.