नागपूरः राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने (Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University) शैक्षणिक शुल्कात 20% वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. यावर सर्वच विद्यार्थी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेत विद्यापीठाच्या निर्णयाचा विरोध केला होता. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाला नमते घ्यावे लागले आणि त्यांनी शुल्कवाढीचा निर्णय मागे घेतला. विद्यापीठाने शुल्कवाढ केल्यावर त्याचा सर्वच स्तरातून वाढता विरोध केला जात होता. व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीमध्ये शुल्कवाढीला स्थगिती देण्यात दिली. शुल्कवाढीच्या विरोधात अभाविप, भाजयुमो, एनएसयुआय आणि युवा ग्रज्युएट फोरम यासह सर्वच संघटनांनी शुल्कवाढ मागे घ्यावी यासाठी आक्रमक पवित्रा घेतला होता.
महाविद्यालय स्तरावर सुरू असलेले पारंपरिक अभ्यासक्रमांचे प्रवेश अंतिम टप्प्यात असताना विद्यापीठाने (RTMNU) शुल्क वाढ करण्याचा निर्णय जाहीर केला. निर्णयानुसार शैक्षणिक सत्र 2022-23 या वर्षांसाठी 20% तर 2023-24 शैक्षणिक सत्रासाठी शुल्कामध्ये शैक्षणिक शुल्कात 7% वाढ करण्यात येणार होती. यासोबतच ज्यांचे प्रवेश झाले आहेत त्यांच्याकडून वाढीव शुल्क घेण्यात यावे अशाही सूचना केल्या होत्या. नवीन शुल्कवाढीनुसार अनुदानित महाविद्यालयांमध्ये विज्ञान व गृहविज्ञानाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी 18,547 रुपये शिकवणी शुल्क तर 12,365रुपये प्रयोगशाळा शुल्क भरावे लागणार होते. खासगी महाविद्यालयात बी.ए. एल.एल.बी. करण्यासाठी आता 41,261 रुपये शिकवणी शुल्क भरावे लागणार होते.
उच्च शिक्षण मंत्र्यांसमोरही आला विषय
विद्यापीठाने केलेल्या या शुल्क वाढीला आता कडाडून विरोध झाला होता. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी नागपूर विद्यापीठात घेतलेल्या बैठकीमध्येही शुल्कवाढीचा विषय चर्चेला आला होता. केवळ खासगी महाविद्यालयांच्या दबावाला बळी पडता ही शुल्क वाढ करण्यात आल्याचा आरोप झाला होता. यावर व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली असून शुल्क वाढ मागे घेण्याची आग्रही मागणी करण्यात आली. संघटनांचा वाढता दबाव व सर्वच स्तरातून होणारी मागणी बघता विद्यापीठाने शुल्क वाढ (Fees Hike) मागे घेतली आहे.
अभाविपची बैठकीत धडक
विद्यापीठाची व्यवस्थापन परीषदेची बैठक सुरू असताना अखील भारतीय विद्यार्थी परीषदेनेचे विद्यार्थी (ABVP) विद्यापीठाच्या प्रशासकीय कार्यालयावर धडकले. त्यांनी कुलगुरू व प्र-कुलगुरूंना भेटण्याची विनंती केली. भाजयुमोचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी थेट व्यवस्थापन समितीच्या बैठकीतच धडक दिली व मागणी केली की आजच या बैठकीत फि वाढीचा निर्णय मागे घ्यावा, असा आक्रामक पवित्रा यावेळी घेतला. युवा मोर्चा व्यवस्थापन समितीच्या बैठक होईपर्यंत तेथेच थांबला होता. बैठक संपताच कुलगुरू यांनी बाहेर आल्यावर फी वाढीला तुर्तास स्तगिती दिल्याची माहिती दिली.
इतर महत्त्वाच्या बातम्या
Nagpur Politics : उपराजधानीत मनसे देणार शिवसेनेला पर्याय! 13 ला राज ठाकरे नागपुरात; नव्या युतीचे संकेत
Nitin Gadkari : ज्येष्ठ आणि दिव्यांगाना तीर्थ क्षेत्र दर्शनासाठी नि:शुल्क ई-बस सेवा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI