नागपूर : महापालिकेत तुकाराम मुंढे यांनी आयुक्त पदाचा कारभार स्वीकारल्यापासून तुकाराम मुंढे आणि नगरसेवकांमध्ये कलगीतुरा सुरू आहे. महापालिकेच्या नाजूक आर्थिक स्थितीचं कारण सांगून तुकाराम मुंढे यांनी अनेक प्रकल्पांच्या कामांना कात्री लावली आहे. तर, भाजपसह सर्वपक्षीय नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागातील कामं आयुक्तांनी बंद केल्याची ओरड सुरू केलीय. आज महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत पुन्हा एकदा महापलिका आयुक्त आणि सर्वपक्षीय नगरसेवक समोरासमोर आले.


या वेळेला मुद्दा होता महापालिकेत गेले अनेक वर्ष अस्थायी सफाई कामगार म्हणून सेवा देणाऱ्या सफाई कामगारांना स्थायी करण्याचा. देवेंद्र फडणवीस सरकारने महापालिकेतील अस्थायी सफाई कामगारांना स्थायी करण्यासंदर्भात काही निकष निश्चित केले होते. त्यामुळे नागपुरातील 4 हजार 100 अस्थायी सफाई कमर्चाऱ्यांपैकी 1 हजार 800 सफाई कर्मचारी स्थायी करण्याच्या यादीत आले होते. त्या 1 हजार 800 कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या स्थायी सेवेत घेण्याचे तत्वतः ठरले होते. मात्र, तुकाराम मुंढे महापालिकेचे आयुक्त म्हणून रुजू झाल्यानंतर महापालिका प्रशासनाने भूमिका बदलवत या 1 हजार 800 कर्मचाऱ्यांना स्थायी करण्याबद्दल नकारात्मक भूमिका घेत महापालिकेच्या नाजूक आर्थिक स्थितीचा कारण पुढे केला आहे. आज सभागृहात पुन्हा या अस्थायी कर्मचाऱ्याने स्थायी करण्याचा मुद्दा आल्यावर प्रशासनाच्या बदललेल्या भूमिकेबद्दल भाजप नगरसेवकांनी तीव्र आक्षेप नोंदवला.

तुकाराम मुंढेंची शाळा, शिवजयंती कार्यक्रमात मोबाईल वाजल्याने जप्त तर जीन्स घातलेल्या कर्मचाऱ्याला झापले

जे सफाई कर्मचारी गेले कित्येक वर्ष नागपूर शहर स्वच्छ ठेवण्याबद्दल मोलाची कामगिरी बजावत आहेत. त्यांना स्थायी दर्जा देण्यासाठीच तत्वतः निर्णय झालेला असताना प्रशासनाने भूमिका बदलविणे, महापालिकेच्या एकूण खर्चात वेतनाचा ( आस्थापनेचा ) खर्च 35 टक्क्यांच्या वर जाण्याचा मुद्दा समोर करणे योग्य नाही अशी भूमिका भाजपने घेतली. त्यांना इतर पक्षीय सदस्यांची ही साथ मिळाली. त्यानंतर या 1 हजार 800 अस्थायी सफाई कर्मचाऱ्यांना येत्या दोन मार्चला, म्हणजेच महापालिकेच्या स्थापना दिनी स्थायी कर्मचारी म्हणून महापालिकेचा शेवट घेण्याचा निर्णय सभागृहाने घेतला. आता या मुद्द्यावर आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वातील प्रशासन आणि नगरसेवकांमध्ये येणाऱ्या काही दिवसात कशी खडाजंगी होते. महापालिका खरोखरच या 1 हजार 800 कर्मचाऱ्यांना स्थायी म्हणून सेवेत स्वीकारते का हे पाहण्यासारखे असणार आहे. दरम्यान, महापालिकेच्या पुढील सर्वसाधारण सभेत आयुक्त तुकाराम मुंढे महापालिकेच्या गेल्या 12 वर्षांच्या आर्थिक स्थितीसंदर्भात एक अहवाल मांडण्याची शक्यता आहे.

आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात काँग्रेस नगरसेवकांची नाराजी

UNCUT Speech | आयुक्त तुकाराम मुंढेंकडून अधिकारी, कर्मचाऱ्यांची शाळा | ABP Majha