नागपूर : नागपूरला तुकाराम मुंढे हे महानगर पालिका आयुक्त देण्यात आले, तेव्हा ह्यामागे राजकारण असून हा देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी ह्यांना प्रशासकीय शह देण्यासाठीकचे पाऊल असू शकते का ह्यावर मतं, मतांतर होती. मात्र, मुंडे ह्यांच्या विरोधातील पहिला आवाज हा मात्र भाजपातून नव्हे तर काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांकडून उठवला गेला आहे. 16 दिवस आधी तुकाराम मुंढे ह्यांनी नागपूरला चार्ज घेतला, पण मुंढे ह्यांनी अजून नगरसेवकांना भेटायची वेळ दिली नाहीये. नगरसेवक सोडा, ही बातमी लिहिपर्यंत त्यांची महापौर संदीप जोशी ह्यांच्याशी देखील एकदाही भेट झालेली नाही.


आपल्या धडाकेबाज कामासाठी प्रसिद्ध असलेले अधिकारी तुकाराम मुंढे यांचा सत्ताधाऱ्यांशी नेहमीच संघर्ष पाहायला मिळाले आहे. कदाचित त्यामुळेच त्यांना इतक्या बदल्यांना सामोरे जावे लागले आहे. अशातच त्यांची नियुक्त भाजपची सत्ता असलेल्या नागपूर महापालिकेचे आयुक्त म्हणून झालीय. मात्र, याठिकाणीही संघर्ष सुरू होण्याची चर्चा हळू आवाजात सुरू झालीय. कारण, आत्तापर्यंत तुकाराम मुंढे कोणत्याच नगरसेवकाला भेटले नसल्याचा आरोप होत आहे. अगदी पहिल्याच दिवशी भेट मागितलेल्या विरोधी पक्ष नेत्यांनाही अजून उलट फोन केलेला नाही. आरोप होतो आहे, की मुंडेंच्या ह्या वागण्यामुळे अनेक कामे पेंडिंग आहेत.

जेव्हा फायर ब्रँड अधिकारी तुकाराम मुंढे डम्पिंग ग्राऊंडला अचानक भेट देतात

एकीकडे महापौर, विरोधी पक्ष नेता ह्यांचे शहरात जनता दरबार सुरू असताना जॉईन झालेल्या मुंडेंनी आपल्या स्वतंत्र भेटी गाठी असणारा जनता दरबार सुरू केला. महापौरांना 16 दिवसानंतर भेटायला येतो असा फोन मुंडेंच्या ऑफिसमधून आजच आला आहे. महापौर स्वतः अजून ही सामंजस्याच्या भूमिकेत असले तरी त्यांनी मुंडे ह्यांना ह्याबाबत सूचना करायचे ठरवले आहे. सकाळी नागपूरच्या भांडेवाडी कचरा संकलन डेपोला मुंडे ह्यांनी भेट दिली असता, नगरसेवकांना भेटत नसल्याचा सवाल त्यांना करण्यात आला होता. मात्र 'इथे हा प्रश्न नको' असे त्यांनी उत्तर दिले.

तुकाराम मुंढे नागपूर महापालिका आयुक्त तर अश्विनी भिडे यांच्याजागी रणजीतसिंह देओल

मी सध्या हे समजून घेतोय - तुकाराम मुंढे
मी नगरसेवकांना अगदीच वेळ दिला नाही, भेटलो नाही हे म्हणणे योग्य नाही. मी 5-6 नगरसेवकांना भेटलोय. फक्त वेगळा असा वेळ मी कोणालाच दिला नाही, तो नगरसेवकांनाही दिला नाही. नवीन आलो आहे, अनेक गोष्टी आणि बैठका आहेत, काही प्लॅन मी पाठवले आहेत. त्यामुळे वेळेअभावी फक्त त्यांना मी आता वेळ देत नाहीये. ह्याचा अर्थ भेटणारच नाही असा नाही. मी लोकांना 4 ते 5 च्या मध्ये भेटतो. मात्र, त्यांनी तेव्हा यावे असं माझं म्हणणं नाही, पण ही वेळ उपलब्ध होती. मी गव्हर्नससाठी आहे. त्यामुळे लोकांना भेटणे ही प्रायोरिटी आहे. थोडं एकदा हे झाले, की बजेट ही बघायचे आहे, त्यानंतर मी भेटीन सर्वांना, अशी प्रतिक्रिया आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली आहे.

Tukaram Munde | कॉंग्रेस नगरसेवकांचा तुकाराम मुंढेंवर आरोप, अनेक काम रखडल्याचा नगरसेवकांचा आरोप