नागपूर : गेल्या 35 दिवस बेपत्ता असलेल्या पंकज गिरमकर या तरुणाची हत्या करुन त्याचा मृतदेह आणि बाईक खड्ड्यात पुरल्याचे स्पष्ट झालंय. पोलिसांनी नागपूर भंडारा रोडवर कापसी पुलाजवळून पंकज गिरमकरचा मृतदेह आणि त्याची बाईक खड्ड्यातून उकरून काढत एका भयावह हत्याकांडाचा पर्दाफाश केलाय. अवैध संबंधातून झालेल्या या हत्याकांडातील आरोपींनी पुरावे नष्ट करण्यासाठी फिल्मी शक्कल लढवत पोलीसांना तब्बल एक महिना झुलवलं. तर तेवढ्याच फिल्मी स्टाईलने पोलीसांनीही या हत्याकांडाचा उलगडा केला.


पंकज गिरमकर(वय 32)नागपूरच्या प्रसिद्ध हल्दीराम फॅक्टरीमध्ये नोकरी करत होता. तो 28 डिसेंबर 2019 पासून बेपत्ता होता. नागपूर पोलीस त्याचा सर्वत्र शोध घेत असताना कधी त्याचा फोन राजस्थानचे लोकेशन दाखवायचा तर कधी पंकजच्या मोबाईलचं लोकेशन मध्यप्रदेशात यायचं. त्यामुळे पोलीसही चक्रावले होते. मात्र, काही दिवसांपूर्वी पोलिसांना गुप्त सूचना मिळाली की पंकजची हत्या करण्यात आली असावी. याचा संबंध नागपूर भंडारा रोडवरील प्रसिद्ध जोगेंद्रसिंह ढाब्याशी आहे. पोलीसांच्या पथकाने ढाब्यावर नजर ठेवणे सुरू केले. रविवारी दुपारी ढाब्याच्या परिसरातून एका खड्ड्यातून पंकज गिरमकरचा मृतदेह आणि त्याची बाईक दोन्ही बाहेर काढण्यात आले.

राज्याला धडकी भरवणाऱ्या वाई हत्यांकाड खटल्याची सुनावणी सुरूरजत वशिष्ठ / नागपुर

अवैध संबंधातून हत्या -

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वी पर्यंत पंकज हल्दीराम फॅक्टरी मधील त्याच्या नोकरीच्या निमित्ताने भंडारा रोडवरील कापसी परिसरात राहत होता. तेव्हा पंकजच्या पत्नीचे परिसरातील ढाबा संचालक अमरसिंह ठाकूर सोबत प्रेम संबंध जुडले. पंकजने त्याची पत्नी आणि अमरसिंह दोघांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा फायदा झाला नाही, परिणामी पंकजने कुटुंबासह नागपूर सोडून वर्ध्यात राहणे सुरू केलं. नोकरीसाठी एकटा नागपूरला ये-जा करू लागला. मात्र, तरीही पत्नी आणि अमरसिंह यांचे फोनद्वारे संपर्क सुरू असल्याने 28 डिसेंबरला अमरसिंहला समजावण्यासाठी पंकज नागपूरला त्याच्या ढाब्यावर आला. तेव्हा आधीच तयारी करून बसलेल्या अमरसिंहने ढाब्यातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने पंकजची हत्या केली आणि नंतर जेसीबीने खड्डा खणून पंकजचा मृतदेह आणि त्याची बाईक खोल खड्ड्यात पुरली. त्यावर 50 किलो मीठ ही टाकले.

स्वच्छंदी वागण्यात अडसर ठरलेल्या वडिलांची मुलाकडून आई आणि मित्रांच्या मदतीने हत्या

आरोपी एवढ्यावरच थांबले नाही, तर त्यांनी पोलीसांची दिशाभूल करण्यासाठी दृश्यम चित्रपटासारखे मृत पंकजचा मोबाईल हायवेवरील एका ट्रकमध्ये फेकून दिला. ट्रक मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये फिरत असताना पोलीसांना पंकजच्या मोबाईलचे वेगवेगळे लोकेशन मिळायचे. परिणामी अनेक आठवडे पंकजचा शोध लागू शकला नाही. अखेर पोलीसांना त्यांच्या खबऱ्याकडून पंकजची हत्या झाल्याचे समजले. पोलीसांनी वेषांतर करून रोज त्या ढाब्यावर जाऊन बसणे सुरू केलं. हळूहळू कानोसा घेत आज ढाबा मालक अमरसिंह ठाकूरला ताब्यात घेत पोलीसी खाक्या दाखविला आणि हत्याकांडाचा उलगडा झाला. या हत्याकांडा संदर्भात आतापर्यंत ढाबा मालक अमरसिंह ठाकूर, त्याचा कूक मनोज तिवारी आणि त्याचा एक मित्र असे तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. तर या घटनेत पंकजच्या पत्नीचा सहभाग आहे का? याचा तपास केला जात आहे. मात्र, या घटनेतून गुन्हेगार कितीही चाणाक्ष असला तरी कानून के हात लंबे होते है और वे गुन्हेगार तक पहुंच ही जाते है. हे पुन्हा सिद्ध झाले आहे.

Aurangabad | औरंगाबादमध्ये कुरिअर कंपनीच्या व्यवस्थापकाची चाकूनं भोसकून हत्या