सातारा : चार वर्षापूर्वी संपुर्ण राज्याला धडकी भरवणाऱ्या वाई हत्यांकाड खटल्याची सुनावणी सातारा जिल्हा न्यायालयातील जिल्हा न्यायाधीश एन. एल. मोरे यांच्यासमोर सुरू झाली आहे. साताऱ्यातील वाई येथील डॉ. संतोष पोळ याने इंजेक्शनच्या माध्यमातून सहा जणांचे खून केल्याचे उघड झाले आणि डॉक्टराच्या या कृत्याने संपुर्ण राज्यात खळबळ उडाली होती. यातील प्रमुख आरोपी डॉ. संतोष पोळ आणि ज्योती मांढरे या दोघांनाही वाई पोलिसांनी अटक केली होती. सामाजिक कार्यकर्त्या मंगल जेधे यांच्या बेपत्ता तक्रारीच्या तपासावेळी हा संपुर्ण प्रकार उघडकिस आला होता.


वैद्यकीय व्यवसायाला काळिमा फासणाऱ्या या प्रकरणात ज्योती मांढरे माफीची साक्षीदार झाली आहे. तिने न्यायालयात जबाबात दिलेली माहिती धक्कादायक आहे. मंगल जेधेला विश्वासात घेऊन पुण्याला जायचे आहे, थकवा नको असे म्हणत या डॉक्टरने तिला विषारी इंजेक्शन देऊन मारले आणि डॉ. संतोषने त्याच्या फार्महाऊस मध्ये नेहून त्या ठिकाणी तिला पुरले, अशी माहिती ज्योती मांढरेने न्यायालयासमोर सांगितली. या वेळी संतोष पोळला कोल्हापूर येथील कारागृहातून सातारा न्यायालयात आणले होते. हा खटला सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील उज्वल निकम लढत आहेत. पुढील सुनावनी 14 फेब्रुवारीला होणार आहे.

याबाबत माहिती अशी की, दोन वर्षांपूर्वी वाई येथील डॉक्टर घोटावळेकर यांच्या दवाखान्यातील कंपाऊंडर असलेल्या संतोष पोळ याने सोन्याचे दागिने आणि पैशाच्या हव्यासापोटी पाच महिलांसह सहाजणांचा खून केला होता. अंगणवाडी सेविका संघटनेच्या राज्याध्यक्षा मंगला जेधे यांच्या खुनानंतर वाई पोलिसांनी संतोष पोळ याला अटक केली. त्यानंतर पोळ याने केलेल्या सर्व खुनांची उकल झाली. पोलिसांनी सर्वांचे मृतदेह ताब्यात घेऊन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

पैशाच्या हव्यासापोटी खून -
पैशाच्या हव्यासापोटी संतोष पोळने हे खून केल्याची कबुली दिली. हत्येनंतर मृतांचे जबरदस्तीने दागिगे काढून घेत असे. हे दागिने सोनार मारवाडी व नातेवाईकांकडे दिले असल्याचे त्याने सांगितले.

संबंधित बातमी -

Angad Singh | अंगद सिंगची हत्या युवक काँग्रेसच्या वादातून | ABP Majha