नागपूर : सिनेमे आपण तसेही बऱ्याच काळापासून आपल्या टीव्ही, मोबाईल आणि लॅपटॉप्सवर बघतच होतो. पण कोविडने नवीन नाटकं सादर होणे. मात्र, थांबवलेच. म्हणतातना खऱ्या प्रेमाला कोणी रोखू शकत नाही? अगदी कमी का होईना, पण काही नाटककारांनी हे सिद्ध करून दाखवले आहे. ते म्हणजे डिजिटल नाटक सादर करून. आताच्या ह्या विकेंडला सुरु आहे बुक माय शो वर नागपूरचे पहिले डिजिटल नाटक - चेहल पेहल.
स्टेजक्राफ्ट हा अभिनेता, लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते विकाश खुराणा ह्यांनी उपराजधानीत 22 वर्ष आधी सुरु केलेला प्रसिद्ध नाट्यसमूह. चेहल पेहल हा स्टेजक्राफ्टचाच डिजिटल उपक्रम. डिजिटल नाटकाची गरज का भासावी हा प्रश्न खुराणा ह्यांना केला असता त्यांनी सांगितले कि कोविडच्या काळाने सर्वांना त्रस्त करून सोडले. आयुष्यच थांबून गेले. ह्यात सर्वात वाईट स्तिथी झाली ती अभिनेत्यांची. स्टेजवरच्या अभिनेत्याला व्यक्त होण्यासाठी कुठलेच माध्यम उरले नाही. त्याच्यातील क्रिएटिव्हिटीलाच ब्रेक लागला. त्यात हे हि स्पष्ट झाले कि पुढच्या वर्षीपर्यंत तरी काही फार ह्या स्तिथीत बदल होणार नाही. मग अश्या वेळी काय केले तर कोविडचे नियम पाळले जातील पण कलाकारांना व्यक्त ही होता येईल ह्यावर खुराणा ह्यांनी बराच विचार केला. बऱ्याच झूम मिटींग्स मधून स्टेजक्राफ्टच्या मंडळींनीही बरेच चिंतन केले आणि मार्ग निघाला डिजिटल नाटकाचा.
मुकेश छाब्रा रियावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार
आता डिजिटल नाटक म्हणजे काय? तर डिजिटल नाटक म्हणजे चक्क केमेराने स्टेजवर शूट केलेले नाटक जे बुक माय शो सारख्या एखाद्या माध्यमातून लोकांसमोर आणायचे. हे करणे विकाश खुराणासाठी ह्यासाठी सोपे होते कारण त्याच्या टीममध्ये अनुभवी फिल्ममेकर अनुराज कुलकर्णी आहेत. मग ह्या नाटकाचे वाचन हे गूगल मिट आणि झूमच्या माध्यमातून सुरु झाले. प्रत्येकाने आपापली रिहर्सल ही वेगळी आपल्या घरी केली. मग प्रश्न होता स्टेजवर शूट करण्याचा. तर तो ही सोडवला कोविडचे नियम पाळत. ज्यांचे ज्यांचे एकत्र सिन होते तेवढीच मंडळी आत हॉल मध्ये असायची. ते स्टेजवर आपला भाग सादर करायचे. तेवढा भाग सिनेमासारखा शूट करून पुढच्या कलाकारांना आत बोलावण्यात यायचे. नंतर अनुरागने हे सर्व व्यवस्थित एडिट ही केले आणि आज, उद्या ते आपल्याला आपल्या घरी बसून बघायला मिळते आहे.
कोरोना संकटातही संधीचं सोनं! नागपुरातील आयटी कंपनीत अमेरिकी कंपनीची 10 कोटी डॉलर्सची गुंतवणूक
माध्यम डिजिटल असल्यामुळे नाटक हि त्याला साजेसे हवे हि भावना विकाश खुराणांची होती. चेहल पेहल हे नागपूरचे नाटक देशात अनेक ठिकाणी ह्या आधीही स्टेजक्राफ्टने सादर केले आहे. ते लोकांना खूप आवडलेही आहे. एक निखळ मनोरंजन असणारी थीम, एक रोमँटिक कॉमेडी जी टीव्हीवर सुरु असेल तर पूर्ण परिवाराला एकत्र बसून बघू शकता येईल शी. ह्या नाटकातील 9 कलाकारांच्या चमूतील 6 हे आधीपासूनच हे नाटक करत असल्यामुळे तोही फायदा झाला. डिजीटल नाटकाची खासियत हि कि इतर वेळी नाट्यगृहात गेलो कि प्रत्येक सदस्याला वेगळे तिकीट काढावे लागते, पण डिजिटल नाटकाला मात्र एकाच तिकिटात पूर्ण परिवार हे नाटक बघू शकतो.
कोरोनाच्या संकटातही संधीचं सोनं! नागपुरातील आयटी कंपनीत अमेरिकी कंपनीची 10 कोटी डॉलर्सची गुंतवणूक