नागपूर : "गणेश टेकडीचं महत्व आहे, जे मागणार ती इच्छा पूर्ण करते. मोठी जवाबदारी हातात घेतल्यानंतर जवाबदारी पूर्णत्वास नेण्यासाठी, लोकांच्या उपयोगाची ठरावी, लोकांना न्याय मिळावा लोकांचे जे दुःख आहे, ते निराकरन करण्याची शक्ती गणेशजी देवो. हा आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे.", असं नाना पटोले यांनी सांगितलं. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज नागपूरमधील प्रसिद्ध गणेश टेकडीवरील गणपतीचं दर्शन घेतलं. त्यावेळी त्यांनी माध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली.


"कोरोनाचं संकट हे मानवनिर्मित होतं. त्याचा विस्तार, प्रसार, भीती कशी निर्माण केली. हे लोकांना आता काळायला लागलं आहे. कोरोनाच्या नावाखाली देशाचं नुकसान केलं, बेरोजगारांचं शेतकऱ्यांचं नुकसान झालं, उद्योगधंदे बंद पडले आहेत. यात कोरोनाच्या नावाखाली मुठभर लोक मात्र श्रीमंत झाले. अंबानीचे उत्पन्न तासाला 90 कोटी उत्पन्न होणं म्हणजे नरेंद्र मोदींचे सरकार कोरोनाच्या नावाखाली देशाला मूर्ख बनवण्याचं आणि देशाची तिजोरी लुटून कशी अंबानी आणि अदाणीच्या घरात भरत होते. हे चित्र जनतेला कळलं आहे. यामुळे बाप्पा हे संकट दूर कर ज्यांनी हे संकट आणलं, या देशाला बरबाद केलं, त्यांना सदबुद्धी दे." अशी प्रार्थना करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.


नाना पटोले बोलताना म्हणाले की, "देशात ईडीचा वापर कसा आणि कोणाला धमकवण्यासाठी करायचा. याची परंपरा नवीन राहिली नाही. मागील सहा वर्षांत जनतेला व्यवसायिकांना कळलं आहे. यांच्या नकली राष्ट्रप्रेमात जे लोक नसतील, त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न सातत्यानं सर्व शहरात सुरु आहे. अविनाश भोसले यांच्यावर ईडीची कारवाई सुरु झाली असेल, तर ते काही नवीन नाही. शरद पवार साहेबांनाही ईडीच्या नावानं धमकवण्याचं काम करण्यात आलं."


राज्यसभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींना अश्रू अनावर झाले, यासंदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले की, "पहिल्यांदा देशाचे पंतप्रधान राज्यसभेत बोलले आणि रडले. यापूर्वी ते बाहेर बोलत होते, मन की बात करत होते. लोकांना पैसे देऊन गोळा करत आणि बाहेरच्या सभा करत होते. आता पहिल्यांदा रडले ही नवीन बातमी आहे."


"राज्याचे राज्यपाल आणि यांनी संविधानिक पदावर बसून लोकांच्या भावना न समजणं, संविधानिक व्यवस्था न समजणं चुकीचं आहे. नरेंद्र मोदींच्या ईशाऱ्यावर वागत असतील, तर त्या विरोधात न्याय मागण्याची भूमीका आमची आहे. आम्ही पण कोर्टात जाऊ, जी नावे कॅबिनेटनं पाठवली आहेत, ती स्वीकृत करावी, अन्यथा न्यायालयात जाऊ." असंही नाना पटोले बोलताना म्हणाले.