नागपूर : सरन्यायाधीश शरद बोबडे ह्यांचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंवरुन काहींनी कौतुक तर काहींनी सरन्यायाधीशांना ट्रोल केलंय. कारण हा फोटो अत्यंत 'कुल' आहे. कारण, सामन्यातः कुठल्याही सरन्यायाधीशांना अशा 'पोज'मध्ये कदाचित पाहिलं नसावं. मात्र, त्याला काही बाजूंनी ट्रोलर्स हे राजकीय रंग ही देण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.


हारले डेव्हिडसनचे सी व्ही ओ 2020 हे टॉप एन्ड बाईकच्या मॉडेलवर नागपूरला आलेल्या सरन्यायाधीश शरद बोबडे ह्यांचा फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे. कळतंय की ही बाईक ज्या ऑटो डीलरकडे आली होती तो सरन्यायाधीशांचा मित्र असल्यामुळे त्याने ही बाईक बोबडे राजभवनात चालायला जातात तिथे आणली. बोबडे ह्यांना तारुण्यापासून ह्यांना वाहनांची असलेली हौस नागपुरात प्रसिद्ध आहे. एका प्रतिष्ठित, धनाढ्य आणि सुशिक्षित परिवारात जन्माला आलेल्या शरद बोबडे ह्यांना त्यांच्या 18 व्या वर्षीच वडिलांनी मर्सिडीज गाडी गिफ्ट केली होती.


राजभवनात आणलेल्या ह्या बाइकवर बसून पाहताना हा कोणीतरी बरोबरच्या व्यक्तीने काढलेला फोटो व्हायरल झाला. मात्र, ह्या फोटोला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. ही गाडी आता जरी विकायला आली असली तरी ती भाजपच्या सोनबा मुसळे नावाच्या नेत्याच्या मुलाची असल्याचे कळते. कोर्टाने सावनेर मतदार संघात 2014 ला निवडणूक न लढू दिलेल्या भाजप उमेदवार म्हणजे सोनबा मुसळे. त्यामुळे काही ट्रोलर्सने भाजपाशी त्यांचा संबंध जोडण्याचा प्रयत्न केला आहे. तर काही ठिकाणी सरन्यायाधीशांनी मास्क, हेल्मेट लावले नाही ह्यावरही ट्रोलिंग झाले. मात्र, जॉगिंग करताना मास्क लावू नये हा सल्ला सध्या आहे. शरद बोबडे यांचे वडील अरविंद बोबडे हे दोनवेळा काँग्रेसच्या काळात महाधिवक्ता होते आणि शरद बोबडे ह्यांनी बाळासाहेब ठाकरे ह्यांची बाजूही उच्च न्यायालयात मांडली होती.


Mission Begin Again | राज्यात 31 जुलैपर्यंत लॉकडाऊनच; मिशन बिगीन अगेनचे जूनमधील नियम कायम


या आधीही व्हायरल झाले होते फोटो

ऐरव्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायदानाची प्रक्रिया पार पाडणारे सरन्यायाधीश शरद बोबडे यांचे यापूर्वीही असेचं फोटो व्हायरल झाले होते. नागपुरात क्रिकेट खेळताना त्यांचे व्हिडीओ आणि फोटो चांगलेच प्रसिद्ध झाले होते. नागपूर बार असोसिएशनच्या वतीने क्रिकेट सामन्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यात राज्यभरातील अनेक नामवंत वकील आणि न्यायाधीशांनी सहभाग घेतला होता. यावेळी सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी या सामन्याचं उद्घाटन केलं होतं.