काय आहे 'मिशन बिगीन अगेन'चा दुसरा टप्पा?
- ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन 6.0
- मिशन बिगिन अगेनच्या पहिल्या टप्प्यात ज्या अटी-शर्ती होत्या त्या कायम ठेवल्या आहेत.
- त्यानुसार महाराष्ट्रातील लॉकडाऊन 31 जुलै रात्री 12 पर्यंत लॉकडाऊन कायम असेल.
- अत्यावश्यक दुकानं आणि ऑन-इव्हन नियमानुसारची नियमावली कायम
- सरकारी आणि खासगी कार्यालयांची नियमावली ही कायम
- राज्यात 31 जुलैपर्यंत जिल्हाबंदी आणि एसटी सेवा ही बंद
- बिगीन अगेननुसार दिलेल्याच सवलतींना मुदतवाढ
राज्यात प्लाझ्मा थेरपीच्या ट्रायलला सुरुवात
कोरोना व्हायरसवरील उपचार पद्धतीत महत्त्वाची समजली जाणारी आणि जगातली सगळ्यात मोठी प्लाझ्मा थेरपीची ट्रायल महाराष्ट्रात सुरु झाली आहे. महाराष्ट्र हे प्लाझ्मा थेरपीचा व्यापक प्रमाणात प्रयोग करणारं देशातील पहिलं राज्य आहे. आजपासून सोलापूर आणि लातूरमध्ये प्लाझ्मा थेरपीच्या ट्रायलला सुरुवात झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी साडेबारा वाजता या ट्रायलचं उद्घाटन केलं. सिव्हिल रुग्णालयाच्या रक्तपेढीत दोन दात्यांना बोलावून त्यांचा प्लाझ्मा काढून घेण्यात आला. यासाठी गेल्या आठवड्यातच मशीन कार्यान्वित झाल्या आहेत.
प्लाझ्मा थेरपीचा वापर कसा?
कोरोनाचे संकट सुरु झाल्यावर मुंबई महानगरपालिकेतील डॉक्टरांनी अशाप्रकारे प्लाझ्मा थेरपीचा प्रयोग करुन रुग्णांवर उपचार करण्याचे ठरवलं. प्लाझ्मा थेरपीमध्ये कोरोनातून बरे झालेल्या व्यक्तींच्या रक्तातून प्लाझ्मा घेऊन कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यात येतात. प्लाझ्मा थेरपी फायदेशीर असल्याचं म्हटलं जात आहे.