Nagpur News Updates: नागपूर : नागपूर (Nagpur News) अमरावती (Amravati) रोडवर बाजार गाव येथे ही कंपनीत आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास स्फोट झाल्याची घटना घडली. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली होती. मात्र, या स्फोटात मृतांचा आकडा वाढल्याची माहिती मिळत आहे. स्फोटात तब्बल नऊ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. मृतांमध्ये 6 महिला आणि 3 पुरुषांचा समावेश आहे. दरम्यान, सोलार एक्सप्लोसिव्ह बनवणाऱ्या कंपनीत हा स्फोट झाला आहे. तसेच, या स्फोटात अनेक मजूरही गंभीररित्या जखमी झाले आहेत. 


नागपूर अमरावती रोडवरील (Nagpur Amravati Road) सोलार एक्सप्लोसिव्ह या डेटोनेटर आणि इतर स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीत आज सकाळी स्फोट झाल्याची माहिती आहे. तब्बल नऊ जण या स्फोटात मृत्यू झाला असून अद्यापही अनेकजण कंपनीत अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे. कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सध्या घटनास्थळी आमदार अनिल देशमुख उपस्थित आहेत. 


आमदार अनिल देशमुख म्हणाले की, अत्यंत दुर्दैवी अपघात झालाय. सोलार एक्सप्लोसिव्ह बनवणारी ही कंपनी आहे. कंपनीच्या एका बिल्डिंगमध्ये मोठा स्फोट झाला. यामध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला आहे.


नेमकं काय घडलं?  


नागपूर अमरावती रोडवर बाजार गाव येथे ही कंपनी असून आज सकाळी नऊ वाजताच्या सुमारास स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे. निर्माण झालेले स्फोटक पॅकिंग करण्याचं काम सुरू असताना हा स्फोट झाल्याची माहिती आहे. स्फोट तीव्र क्षमतेचा होता आणि त्यामध्ये तिथे असलेले अनेक मजूर गंभीरित्या जखमी झाले आहेत. या घटनेत काही जणांचा मृत्यू झाल्याची ही माहिती आहे. मात्र पोलीस किंवा प्रशासनाकडून त्याची अद्याप पुष्टी झालेली नाही.


वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहिती प्रमाणे किमान पाच जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. सोलार एक्सप्लोजिव्ह या कंपनीच्या मुख्य दारासमोर मोठ्या संख्येने कामगारांचे नातेवाईक जमले आहे.