नागपूर : स्वच्छ भारत अभियान (swachh bharat abhiyan) अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सोमवारी 10 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 75 हजार रुपयांचा दंड (Fine) वसूल केला. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात धंतोली, गांधीबाग, सतरंजीपूरा आणि लकडगंज झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे (NDS) प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 4 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 35,000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच 2,948 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.
उपद्रव शोध पथकाने प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल धंतोली झोन (Dhantoli) अंतर्गत कॉटन मार्केट येथील जय दुर्गा इन्टरप्राईजेस या दुकानाविरुध्द कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. गांधीबाग झोन (Gandhibag) अंतर्गत मेन रोड, इतवारी येथील मोर्डन टेक्स्टाईल्स या दुकानाविरुध्द कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. सतरंजीपूरा झोन (Satranjipura) अंतर्गत बिनकर कॉलणी, तांडापेठ येथील घाटाखाये अगरबत्ती यांच्याविरुध्द कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. उपद्रव शोध पथकाने प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल व्यापारी संजय जांगीड, वेदप्रकाश पांडे, दादु भाई, श्याम भाई यांच्याकडून प्रत्येकी पाच हजार रूपये दंड वसूल केला आहे.
2940 किलो प्लास्टीक जप्त
कारवाईअंतर्गत प्रतिबंधित सिंगल युज 2940 किलो प्लास्टीक जप्त करण्यात आले आहे. पथकाने जप्त केलेले प्लास्टीक भावनगर गुजरात येथून आले होते. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे एनडीएस पथक प्रमुख आणि त्यांच्या पथकाने स्माल फैक्टरी एरिया, लकडगंज आणि मौरानीपूर ट्रान्सपोर्ट कंपनीविरोधाक कारवाई करून, 20 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. त्याचप्रमाणे धंतोली झोन अंतर्गत नरेन्द्रनगर येथील आत्मानंद गोडबोले यांच्याविरुध्द स्वत:च्या खुल्या भुखंडावर झाडांचा कचरा पसरविल्याबद्दल आणि प्रदुषण केल्याबद्दल कारवाई करून 8 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. नेहरुनगर झोन अंतर्गत खरबी रोड येथील दिनेश मिष्ठाण भंडार आणि नटरंज बार ॲण्ड रेस्टॉरेन्ट यांच्याविरुध्द रस्त्यालगत रेस्टॉरेन्टचा कचरा पसरविल्याबद्दल आणि कचरा शुल्क न भरल्याबद्दल कारवाई करून 12 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. आशिनगर झोन अंतर्गत आंबेडकर गार्डन जवळ, वैशाली नगर येथील बजरंग बली कन्स्ट्रक्शन यांच्याविरुध्द रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरवून ठेवल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
प्रदूषण करणाऱ्यांवरही कारवाई
मंगलवारी झोन (Mangalwari Zone) अंतर्गत इंदोरा चौक, कामठी रोड येथील श्याम ऑप्टीकल्स यांच्याविरुध्द रस्त्यालगत काच कापण्याचे काम केल्यामुळे आणि धुळ आणि ध्वनी प्रदूषण पसरविल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच झिंगाबाई टाकळी येथील जनाब फुरकन अली यांच्याविरुध्द बांधकामासाठी सिंटिंग केल्याप्रमाणे रस्त्यावर केलेल्या अतिक्रमणाबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.