नागपूर: पैशांवरून झालेल्या वादात सांगलीच्या एका व्यावसायिकाने नागपुरातील एका व्यावसायिकाचे अपहरण केले. त्याला मारहाण करून सांगलीला नेले. याबाबत माहिती मिळताच नागपूरातील व्यवसायिकाच्या पत्नीने पोलिसात तक्रार केली. तत्काळ गुन्हा नोंदवून सांगली पोलिसांच्या मदतीने व्यावसायिकाला सोडविण्यात आले. या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.


वाठोडा परिसरात राहणारे भूषण वसंत तन्ना (37) धान्याची दलाली करतात. सांगलीच्या तासगावात राहणाऱ्या प्रवीण चव्हाणकडून त्यांनी किशमीश खरेदी केले होते. तन्ना यांनी माल तर घेतला, मात्र मालाचे 39 लाख रुपये देत नव्हते. प्रवीणने अनेकदा त्यांना पैशांची मागणी केली. मात्र ते नेहमी टाळाटाळ करायचे. 14 ऑगस्टला सकाळी प्रवीण काही जणांना सोबत घेऊन तन्नाच्या घरी पोहोचला. 


गाडीत डांबून नेले सांगली


नागपुरात भूखंड खरेदीबाबत बोलायचे असल्याची बतावणी करून तन्नाला गणेश टेकडी पुलावर घेऊन गेला. तेथे प्रवीणने त्यांना आपले पैसे मागितले. तन्नाने पुन्हा टाळाटाळ केली. यामुळे प्रवीण आणि त्याचे साथीदार तन्नाला जबरीने आपल्या वाहनात बसवून सांगलीला घेऊन गेले. या दरम्यान तन्नाची पत्नी श्वेताने अनेकदा कॉल केला. मात्र फोन बंद होता. सोमवारी आरोपींनी श्वेताचा फोन उचलला. तिला गुन्हे शाखेतून बोलत असल्याचे सांगितले. तसेच तन्ना विरुद्ध फसवणुकीची तक्रार करण्यात आली होती, त्यामुळे त्याला सांगलीला आणल्याची माहिती दिली.


आपण मला अमिताभ बच्चन म्हटलंय, माझं शरीर अमजद खानसारखं! मी म्हणू शकतो कितने आदमी थे? : देवेंद्र फडणवीस


मोबाईल लोकेशनवरुन उलगडा


श्वेताला चिंता होऊ लागली. वारंवार कॉल केला असता जेव्हापर्यंत पैसे मिळणार नाही तोपर्यंत तन्नाला सोडणार नाही असे प्रवीणने तिला सांगितले. मंगळवारी श्वेताने पोलिसात तक्रार केली. सीताबर्डी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदविला. तत्काळ सांगलीचे एसपी आणि तासगाव पोलिसांशी संपर्क करून आरोपींचे लोकेशन देण्यात आले. सांगली पोलिसांनी प्रवीण आणि त्याच्या साथीदाराला अटक करून तन्नाची सुटका केली. सीताबर्डी ठाण्याचे एक पथक त्यांना घेण्यासाठी सांगलीला पोहोचले. गुरुवारी त्यांना नागपूरला आणून संपूर्ण घटनेची माहिती घेतली जाईल.


Nagpur News : गोविंदांना आरक्षण : मु्ख्यमंत्र्यांनी प्रशासनिक बाबी लक्षात न घेता भावनिक होऊन निर्णय जाहीर केला : अजित पवार


किमया रुग्णालयात तोडफोड, धक्काबुक्की


नागपूरः शहरातील सेंट्रल एव्हेन्यू मार्गावरील किमया रुग्णालयात उपाचारादरम्यान एका रुग्णाचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी रुग्णालयात तोडफोड करत कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली. या संदर्भात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.