नागपूरः शुक्रवारी रात्री सुराबर्डी परिसरात एका 20 वर्षीय तरुणीचा मृतदेह गळा चिरलेल्या अवस्थेत आढळून आला होता. या घटनेचा उलगडा कोराडी पोलिसांनी केला असून काही दिवसांपूर्वी घट्ट मैत्री असलेल्या मित्रानेच तिचा खून केल्याचे तपासातून उघड झाले आहे. नागपुरातील खापरखेडा परिसरात राहणाऱ्या एका वीस वर्षीय तरुणीची आरोपी अकिंत रंधे सोबत चांगली मैत्री होती. मात्र काही दिवसांपासून त्यांच्या भांडण होत होते. त्यामुळे त्यांच्यात दुरावा निर्माण झाला होता. तरुणी आपल्यापासून दूर जात असल्याचा संशय अंकितला आल्याने तो अस्वस्थ होता. त्यामुळे त्यांच्यातील सततचे वाद होत होते.
तरुणी एका खासगी रुग्णालयात नोकरीला होती. शुक्रवारी ती नेहमीप्रमाणे गेली होती. आईने तिला फोन केला असता चार पर्यंत येणार असे तिने सांगितले होते. तेव्हाच तिला भेटण्यासाठी अंकितने फोन केला. रुग्णालयातून निघाल्यावर दोघेही सुराबर्डी येथे भेटले. त्याच ठिकाणी एका पडक्या इमारतीजवळ दोघेही भेटले.
बुस्टर डोस घेणाऱ्यांमध्ये नागपूर अव्वल, आतापर्यंत 43,3121 नागरिकांनी घेतली प्रतिबंधात्मक लसीची तिसरी मात्रा
एकांतस्थळी पुन्हा वाद, अन् हत्या
यावेळी पुन्हा दोघांमध्ये बोलता बोलताच वाद सुरु झाला आणि विकोपाला गेला. त्यातून आरोपी अंकितने तरुणीचा गळा चिरुन हत्या केली आणि तिची गाडी घेऊन फरार झाला. मुगली सायंकाळ पर्यंतही परतली नसल्याने कुटुंबियांशी शोध सुरु केला.
पोलिसांनी फिरवली तपासाची चक्रे
पोलिसांना काल शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास काजल कुकडे (वय 20) हिचा गळा चिरलेल्या अवस्थेतला मृतदेह कोराडी पोलीस स्टेशन हद्दीत सूरादेवी परिसरात आढळला होता. प्रथमदर्शी तिची गळा चिरून हत्या केल्याचा पोलिसांना संशय होता. त्यानंतर पोलिसांनी कुटुंबीयांना माहिती दिली आणि काजलची हत्या झाल्याचा उलगडा झाला.
Nagpur : आज हिवरी रे-आऊट येथे 'महागाईची दही हंडी', विजेता गोविंदा पथकाला 2 लाख 22 हजार 222 रुपयांचे पुरस्कार
खाक्या दाखवताच अंकित बोलला
मृत तरुणीच्या मोबाईलचा तपास केल्यावर पोलिसांना अंकितवर संशय आला. यासंदर्भात पोलिसांनी त्याला तपासासाठी बोलावले आणि पोलिसांच्या खाक्या दाखवताच त्याने हत्येची कबूली दिली. यासंदर्भात पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
'सॉरी आई-बाबा' म्हणत तरुणाची आत्महत्या
नागपूरः सॉरी आई-बाबा, मी तुमच्या अपेक्षा पूर्ण नाही करू शकलो, असे म्हणत मर्चंट नेव्हीची तयारी करीत असलेल्या एका 28 वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. धरमपेठेतील ऋतसृष्टी संकुलातील पाचव्या माळ्यावरील फ्लॅटमध्ये उघडकीस आली. करण शांतिलाल जयस्वाल (मुळ रा. माळीपुरा नवप्रशांत चौक, यवतमाळ) असे युवकाचे नाव आहे.