बारा जानेवारीच्या रात्री नागपूर जिल्ह्यातील सावनेरमध्ये अंगद सिंह नावाच्या जिम संचालकाची हत्या झाली होती. पोलिसांनी त्यामागे दोन जिम संचालकांचे भांडण असल्याचे सांगितले होते. मात्र, आता अंगद सिंहच्या कुटुंबीयांनी या प्रकरणामागे पक्षातील तरुणांमधील स्पर्धेचे कारण असल्याचे खळबळजनक आरोप केले आहे. हत्या झालेल्या अंगद सिंह यांच्या मोठ्या भावाचा आरोप आहे की, हत्येच्या दिवशी अंगद सिंहला त्याच्या काही मित्रांनी फोन करून घटनेच्या ठिकाणी बोलावले होते. त्यांच्यावर विश्वास ठेऊनच तो घटना घडली त्या नाग मंदिराजवळ गेला होता. आणि तिथे त्याची धोक्याने हत्या करण्यात आली.
Angad Singh | अंगद सिंगची हत्या युवक काँग्रेसच्या वादातून | ABP Majha
यासंदर्भातील काही कॉल रेकॉर्डिंग (अंगद आणि त्याच्या त्या मित्रामधील संभाषणाचे ) अंगदच्या फोन मधून कुटुंबियांना मिळाले आहेत. त्यात अंगदचा एक मित्र त्याला घटनेच्या ठिकाणी येण्यासाठी बोलावतो आहे. त्यामुळे अंगद यांच्या कुटुंबीयांचा आरोप आहे की, अंगदला घरातून बोलावले आणि धोक्याने मारले गेले आहे.
काँग्रेस पक्षातील काही तरुणांनी तो कट केल्याचा आरोप अगदी सिंहच्या कुटुंबीयांनी केला आहे. पोलिसांनी निरपेक्ष तपास करून सर्व आरोपींना शोधून त्यांना कठोर शिक्षेपर्यंत पोहोचवावे अशी मागणी सिंह कुटुंबियानी केली आहे. काल सावनेर शहरात अंगद सिंहच्या हत्येच्या सर्व आरोपींना अटक करण्यासाठी आणि न्यायाची मागणी करण्यासाठी काही नागरिकांनी कँडल मार्च ही काढला होता. विशेष म्हणजे हत्या झालेला अंगद सिंह काँग्रेसचा कार्यकर्ता होता आणि तो क्रीडा मंत्री सुनील केदार यांचा खास ही होता.
दरम्यान, आनंद सिंहच्या फोन मधून एक कॉल रेकॉर्डिंग त्याच्या आणि हत्येचा मुख्य आरोपी असलेल्या नरेंद्र सिंह दरम्यान झालेला संभाषणाची आहे. त्यामध्ये दोघे एकमेकांना मारण्याची धमकी देत आहे. त्यामुळे दोघांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून धुसफूस सुरु होती हे स्पष्ट होत आहे.
संबंधित बातम्या :
निवडणुकीआधीच्या मेगाभरतीने भाजपची संस्कृती बिघडली, चंद्रकांत पाटील यांची कबुली
निर्भया प्रकरणात फाशीची तारीख पुढे ढकलली, आता 1 फेब्रुवारीला दोषींना फाशी