आधीच 105 जागा जिंकल्यानंतरही भाजपला विरोधात बसावं लागल्याचं शल्य आहे. त्यात अनेक निष्ठावंतांना तिकीटं मिळाली नाही याचाही राग आहे. त्यामुळे खुद्द पक्षाध्यक्षांनीच मेगाभरतीला वाचा फोडल्याने भाजपमधला हा असंतोष कदाचित वाढीस लागण्याची शक्यता आहे. दरम्यान मेगाभरतीसंदर्भात चंद्रकांत पाटलांनी केलेल्या विधानावर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी खोचक टीका केली आहे. या धक्क्यातून सावरण्याची शक्ती परमेश्वर भाजपला देवो अशा शब्दात त्यांनी टोला हाणला आहे.
चंद्रकांत पाटील यांच्या आधी माजी मंत्री राम शिंदे यांनी देखील राधाकृष्ण विखे पाटील आणि एकूणच झालेल्या इनकमिंगवर नाराजी व्यक्त केली होती. पक्षातील काही नेत्यांनी विरोधात काम केल्याचा आरोपही राम शिंदेंनी केला होता.
या दिग्गजांनी केला भाजप प्रवेश
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस- राष्ट्रवादीतील अनेक दिग्गजांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. फडणवीस मुख्यमंत्री असताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते राहिलेले राधाकृष्ण विखे पाटील, साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले, शिवेंद्रराजे भोसले, राष्ट्रवादीचे नवी मुंबईतील बडे नेते, माजी मंत्री गणेश नाईक, मुंबईतील काँग्रेस नेते, माजी मंत्री कृपाशंकर सिंह यांच्यासह इंदापूरचे काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील, साताऱ्याचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष आणि पृथ्वीराज चव्हाण यांचे निकटवर्तीय आनंदराव पाटील, राष्ट्रवादीचे दिग्गज नेते पद्मसिंह पाटील यांचे पुत्र आमदार राणा जगजितसिंह, राष्ट्रवादीचे माजी खासदार धनंजय महाडिक, काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे, राष्ट्रवादीचे दिग्गज नेते मधुकरराव पिचड, त्यांचे पुत्र विद्यमान आमदार वैभव पिचड, संदीप नाईक, चित्रा वाघ, काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता.
संबंधित बातम्या
- भाजपची मेगाभरती; काँग्रेस राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश
- काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार
- राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरला, मुख्यमंत्री आणि नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत भाजपप्रवेश
- एक आणि पाच सप्टेंबरला भाजपमध्ये मेगाभरती, अमित शाहांच्या उपस्थितीत 'या' दिग्गज नेत्यांच्या प्रवेशाची चर्चा
- आमची मेगाभरती नाही लिमिटेड भरती : मुख्यमंत्री