Special Trains from Nagpur : ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वे नागपूरहून 30 विशेष गाड्या (Special Trains) चालवणार आहे. पुणे-अजनी साप्ताहिक विशेष (10 सेवा म्हणजेच दहा फेऱ्या): 01443 विशेष गाडी पुण्याहून 6 डिसेंबर सुरु झाली असून ती 3 जानेवारी (5 सेवा) दर मंगळवारी सुटेल आणि 1444 विशेष गाडी काल म्हणजेच 7 डिसेंबर ते 4 जानेवारी (5 सेवा) दर बुधवारी सुटेल. ही गाडी अजनीला 19.50 वाजता सुटेल आणि पुण्याला दुसऱ्या दिवशी 11.35 वाजता पोहोचेल.
मुंबई-नागपूर साप्ताहिक विशेष (10 फेऱ्या) : 01449 विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 6 डिसेंबरपासून सुरु झाली असून ती 3 जानेवारी (5 सेवा) दर मंगळवारी सुटेल. ही गाडी 20.15 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी 10.25 वाजता नागपूरला (Nagpur Railway Station) पोहोचेल. त्याचप्रमाणे 01450 विशेष उद्या म्हणजेच, 9 डिसेंबर ते 7 जानेवारी (5 सेवा) या कालावधीत धावेल. ही गाडी नागपूरहून दर शुक्रवारी 13.30 वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनसला दुसऱ्या दिवशी 03.45 वाजता पोहोचेल. पुणे-नागपूर साप्ताहिक विशेष (10): 01451 विशेष गाडी कालपासून सुरु झाली असून (7 डिसेंबर) 4 जानेवारी (5 सेवा) दर बुधवारी नागपूरहून सुटेल. ही गाडी 13.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 06.25 वाजता पुण्याला पोहोचेल. 01452 ही स्पेशल गाडी आज, म्हणजेच 8 डिसेंबर ते 5 जानेवारी (5 सेवा) धावणार आहे.
बिलासपूरकडे जाणाऱ्या गाड्या तासनतास उशिरा
नागपूर ते बिलासपूर (nagpur to bilaspur train) जाणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक बिघडले असून पहाटे सुटणाऱ्या नागपूर बिलासपूर या इंटरसिटीसह जवळपास सर्वच गाड्या तासनतास उशिराने चालत आहे. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच बिलासपूर ते इतवारी धावणारी इंटरसिटी गाडी देखील उशिरा धावत आहे. यामुळे मार्गातील बिलासपूर, रायपूर, दुर्ग, राजनगाव, डोंगरगढ, गोंदिया येथेही गाड्या उशिरा पोहोचत आहे. मात्र गाड्यांमध्ये सध्या गर्दी नसल्याने नागरिकांना वेळेवरही काढलेले तिकीट कनफर्म मिळत असल्याचा दिसाला मिळत आहे.
नागपूर-बिलासपूर वंदे भारत एक्स्प्रेस 11 डिसेंबरपासून
बिलासपूर-नागपूर-बिलासपूर वंदे भारत एक्स्प्रेस सुरु करण्यापूर्वी या एक्सप्रेसचा ट्रायल रन सुरु असल्याची माहिती आहे. वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनचा रेक बुधवारी रात्री गोंदियामार्गे बिलासपूरला पोहोचला. हा रेक इंटिग्रल कोच फॅक्टरी चेन्नई येथून बल्लारशाह-गोंदिया मार्गे चालवण्यात आला. रात्री 8.30च्या सुमारास गाडी गोंदियाला पोहोचली असल्याची माहिती आहे. काही काळ थांबल्यानंतर वंदे भारतला बिलासपूरला पाठवण्यात आले. महत्त्वाचं म्हणजे येत्या 11 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूर-बिलासपूर वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे. त्यानंतर प्रवाशांसाठी ही ट्रेन सुरु होणार आहे. वंदे भारत एक्सप्रेसची ट्रायल रन उद्या, 9 आणि 10 डिसेंबरला बिलासपूर-नागपूर-बिलासपूर दरम्यान होणार आहे.
ही बातमी देखील वाचा