मनमाड : गेम खेळायला मोबाईल न दिल्याने रागातून एका 19 वर्षीय तरुणाने चक्क गावातील तरुण शेतकऱ्याच्या डोक्यात दगड घालून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. पोलिस तपासात ही बाब उघकडीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सुनिल शिवाजी मोरे या तरुणास ताब्यात घेतलं आहे.

Continues below advertisement


नाशिक जिल्ह्यातील नांदगवा तालूक्यातील भौरी गावातील तरुण शेतकरी जिभाऊ गायकवाड याचा दोन दिवसापूर्वी त्याच्या शेताजवळ मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत तपास सुरु केला. मात्र त्यावेळी मयत जिभाऊचा मोबाईल पोलिसांना मिळाला नाही. अधिक तपास केला असता तो मोबाईल गावातीलच व्यक्तीकडे असल्याचं समजलं आणि पोलीस सुनिल मोरे याच्यापर्यंत पोहचले.


सुनिलला मोबाईल मधील फ्री फायर गेम खेळण्याचे व्यसन लागले होते. स्वत:चा मोबाईल खराब झाल्याने तसाच मोबाईल जिभाऊकडे असल्याने आठ दिवसापासून सुनिल त्याच्याकडे तो मोबाईल मागत होता. मात्र जिभाऊने मोबाईल देण्यास नकार दिला. जिभाऊचा मोबाईल मिळवण्यासाठी सुनिलने संधी साधत त्याच्या डोक्यात दगड घालत मोबाईल मिळवला.


मात्र जिभाऊचा मृतदेह हाती लागल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली. अधिक पोलीस तपासाअंती केवळ फ्री फायर गेम खेळण्याच्या आहारी गेलेल्या सुनिल मोरे याने गेम खेळण्यासाठी मोबाईल मिळावा यासाठी जिभाऊची हत्या केल्याची केल्याची कबुली दिली.