Municipality Election News : पुढील आठवड्यात नगरपालिका निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पहिल्या टप्प्यात राज्यातील 246 नगरपालिका, 42 नगरपंचायतीची निवडणूक पार पडणार आहे. 21 दिवसात निवडणूक प्रक्रिया पार पडताना तात्काळ दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची सुद्धा घोषणा निवडणूक आयोगाकडून केली जाऊ शकते. तर शेवटच्या टप्प्यात महापालिका निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. 

Continues below advertisement

दरम्यान, महापालिका, नगरपालिका, नगर पंचायती, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका तीन टप्प्यांत पार पाडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. नगरपालिका आणि पंचायतीच्या निवडणुकीसाठी नोव्हेंबरमध्ये मतदान होईल. नगरपालिका निवडणुकीची घोषणा सोमवारी किंवा मंगळवारी केली जाण्याची शक्यता वर्तविली जाते. यामुळे राज्यात आचारसंहिता लागू होईल.

महापालिकांच्या निवडणुका 15 ते 20 जानेवारी 2026 च्या आत घेण्याचा घेण्याचा आयोगाचा प्रयत्न

मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका 15 ते 20 जानेवारी 2026 च्या आत घेण्याचा घेण्याचा आयोगाचा प्रयत्न राहणार आहे. नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी नोव्हेंबरमध्ये मतदान होईल. नगरपालिका निवडणुकीची प्रक्रिया सुरू असताना किंवा मतदानानंतर लगेच जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले जाईल. अतिवृष्टी आणि पुरामुळे सरकारी यंत्रणा अजूनही ग्रामीण भागातील मदतकार्यात गुंतलेली आहे. त्यामुळे या निवडणुका डिसेंबरमध्ये होणार असल्याचे खात्रीलायकरित्या समजते. जिल्हा परिषद निवडणुकीची प्रक्रिया सुरु असतानाच महापालिका निवडणुकांची घोषणा होऊ शकते. सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी 31 जानेवारी 2026 ची मुदत दिली आहे. निवडणुकीच्या दरम्यान किंवा नंतर न्यायालयीन प्रकरणे उद्भवण्याची शक्यता लक्षात घेऊन महापालिका निवडणुका मुदतीपूर्वी 10 दिवस आधी पार पाडल्या जातील, असे सूत्रांनी सांगितले.

Continues below advertisement

नगरपालिकांची निवडणूक आधी होणार, त्यानंतर जिल्हा परिषदेची निवडणूक होणार 

महाराष्ट्रात अतिवृष्टी व पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांसह सामान्य नागरिक त्यातून आतासे सावरत आहेत. त्यातच काही भागात गेल्या आठ-पंधरा दिवसांत मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. या पार्श्वभूमीवर आधी जि. प. निवडणूक घ्यावी का याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी संमिश्र मते व्यक्त केली. अतिवृष्टीग्रस्त भागातील जिल्हाधिकाऱ्यांनी लगेच जिल्हा परिषद, पंचायत समित्यांची निवडणूक घेण्यासारखी स्थिती नाही असे मत नोंदविले. या पार्श्वभूमीवर नगरपालिकांची निवडणूक आधी होईल. याबाबतची घोषणा पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे. 

महत्वाच्या बातम्या:

Chandrashekhar Bawankule : दुबार मतदार यादी ही 25 वर्षांपासून, संपूर्ण यादी स्क्रॅप केल्याशिवाय... चंद्रशेखर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?