Ravindra Chavan :  महाविकास आघाडीच्या काही घटक पक्षांनी मुंबईत मोर्चा काढण्याचा निर्धार एका महिन्यापूर्वीच केला होता. कोणी काय करावं? कोणत्या नेत्याने कशापद्धतीचा विषय मांडावा. अनेक विषय वेगवेगळ्या पद्धतीने मांडायला सुरुवात झाल्याचे मत भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले. महाराष्ट्र प्रत्येक क्षेत्रात पुढे गेला पाहिजे हे आपण ठरवलं पाहिजे. हा मोर्चा जनतेची दिशाभूल करणारा मोर्चा आहे. विरोधकांचा मोर्चा आहे, असं समजू नका असे रविंद्र चव्हाण म्हणाले. 

Continues below advertisement

अनेक एनजीओ या विरोधकांना खतपाणी घालण्याचा प्रयत्न करत आहेत. जनतेला विनंती आहे की हा यांचा कट हाणून पाडला पाहिजे. एका चांगल्या दिशेनं महाराष्ट्राला न्यायचे आहे. स्वप्नातला महाराष्ट्र पिरीयड इकॉनॉमीकडे पाहात आहे, असेही चव्हाण म्हणाले. बूथ लेव्हलच्या कार्यकर्त्यांनी हा डाव उधळून लावावा, घरोघरी जात नागरिकांना स्पष्ट केलं पाहिजे असे मत चव्हाण यांनी व्यक्त केले. 

सत्तेच्या अडीच वर्षात हे कधीच एकमताने निर्णय घेऊ शकले नाहीत 

देशभरातील निवडणुकीचे वातावरण आहे. बिहार निवडणुकीतील परिणाम असेल, कोणी एक पाऊल पुढे टाकलं मगस एका विषयाला वेगळं वळण तर लागणार नाही ना म्हणून कॉँग्रेसने अंग काढून घेतलं आहे. नेमकी यांची भूमिका काय? पुढे काय न्यायचे आहे का? याची स्पष्टता यांच्याकडून आली नाही. यांची बिघाडी आहे. यांच्या सत्तेच्या अडीच वर्षात हे कधीच एकमताने निर्णय घेऊ शकले नाहीत असेही चव्हाण म्हणाले. काँग्रेस राष्ट्रवादी कॉमन अजेंड्यावर काम करु शकली नाही असेही चव्हाण म्हणाले. 

Continues below advertisement

विरोधकांकडून विकासाची चर्चा बंद आहे

बाळासाहेब यांचे स्वप्न काय होतं? प्रत्येकाला घर मिळालं पाहिजे. बीडीडी चाळीतील प्रकल्प आणि घर देण्याचे काम केले तर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात केलं गेलं. मात्र, तुमच्या सोबतच्या लोकांनी पत्राचाळ किंवा इतर प्रकल्प लालफितीत अडकवून ठेवले. इथला विकासक, भाडेकरुंना न्याय देऊ शकत नसेल, तर पुर्नविकास करावा. याची दूरदृष्टी कोणाकडे असेल तर ते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आहे असे रविंद्र चव्हाण म्हणाले. अस्मानी संकट आलं, तेव्हा पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वात प्रत्येक गावांना जोडणं, शेतकऱ्यांची भूक, जमीन सुजलाम सुफलाम झाली पाहिजे. यासाठी महायुतीचे सरकार पाहात आहे. विरोधकांकडून विकासाची चर्चा बंद आहे. योजनांची चर्चा बंद आहे, पुढे राज्य कसं जातंय याची चर्चा बंद आहे. गतिमान करण्याचे काम आपण करतोय तेव्हा काही एनजीओ, महाराष्ट्र आणि देशात मोठ्या प्रमाणात फंडिंग करत एनजीओच्या माध्यमातून अशा काही मंडळींना खत पाणी घातलं जात आहे असे चव्हाण म्हणाले.