हार्बर रेल्वे मार्गावरील शिवडी रेल्वेस्थानकावर एक तरुण स्टण्ट करतानाचा व्हिडीओ समाज माध्यमांत व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत दिसत आहे की, हा तरुण फलाटावरुन पाय घासत जातो. फलाट संपल्यानंतर रेल्वे रुळालगतच्या झाडांना हाताने स्पर्श करण्याचा प्रयत्न करताना व्हिडीओमध्ये दिसत आहे. या व्हिडीओमुळे आता तरी रेल्वे प्रशासन या स्टण्टबाज युवकांवर कारवाई करणार का? असा सवाल प्रवासी विचारत आहेत.
व्हिडीओ पाहा
रेल्वे प्रशासन आणि अनेक सामाजिक संस्था या नेहमीच जनजागृती करत असतात. जीवघेणे स्टण्ट न करण्याचे आवाहन करत असतात. परंतु त्याचा फारसा परिणाम होताना दिसत नाही. त्यामुळे आता पालकांनीदेखील त्यांच्या मुलांकडे अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.