मुंबई : मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपामध्ये येस बँकेचे संस्थापक आणि माजी व्यवस्थापकीय संचालक राणा कपूर यांना 11 मार्चपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे. ईडीकडून राणा कपूर यांच्यासोबतच त्यांच्या परिवाराचीही चौकशी सुरू आहे. राणा कपूर यांची पत्नी बिंदु कपूर आणि तीन मुली राधा, रोशनी आणि राखी कपूर यांच्यासोबतच राणा कपूर यांचे जावई आदित्य यांच्याविरोधात लूक आऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. यामध्ये गांधी परिवार आणि राणा कपूर यांच्यातील एक कडी समोर आली आहे. प्रियांका गांधी यांचं एक पेन्टिंग येस बँकेचे संस्थापक आणि माजी व्यवस्थापकीय संचालक राणा कपूर यांनी 2 कोटी रूपयांना खरेदी करण्यात आलं होतं. त्यावरून भाजपने काँग्रेसवर टिकास्त्र लादलं आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येस बँकेचे संस्थापक आणि माजी व्यवस्थापकीय संचालक राणा कपूर यांनी 2018मध्ये आपल्या पदाचा गैरवापर करून आणि नियम बाह्य कर्ज देऊन त्याच्या मोबदल्यात 600 कोटींचे कमिशन आपल्या मुलींच्या नावी असलेल्या कंपनीत घेतले. हा पैसे जनतेचा होता ज्याचा गैरवापर कपूर यांनी केला. या कर्जाच्या मोबदल्यात रोशनीची कंपनी जी वस्तू गहाण ठेवली त्याची किंमत फक्त 40 कोटी रुपये होती. आता 40 कोटींच्या ठेवी ठेवून 600 कोटींचे कर्ज डीएचएफने का दिले हा मोठा प्रश्न आहे.
पाहा व्हिडीओ : Yes Bank | येस बँकेवरील निर्बंधामुळे सरकारची कर्जमाफी योजना अडचणीत | स्पेशल रिपोर्ट
ईडीकडून सध्या वित्तीय वर्ष 2017 ते 2019 ची तपासणी करण्यात येत आहे. या वर्षातील बँलेन्स शीट्स आणि ट्राजॅक्शन्सच्या आधारावर चौकशी करण्यात येत आहे. आतापर्यंतच्या चौकशीमध्ये प्रियांका गांधी किंवा दिल्लीच्या कोणत्याही नेत्याचं नाव समोर येत नाही आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियांका गांधींचं पेन्टिंग राणा कपूर यांनी खरेदी केलं आहे. त्याबाबत कोणतीच अधिकृत माहिती अजिबात समोर आलेली नाही. यूपीए-2च्या कार्यकाळात येस बँकेकडून कर्ज घेण्यासाठी कोणत्याही प्रकारचा प्रभाव टाकण्यात आला आहे किंवा कोणत्याही मोठ्या नेत्याच्या नावाचा उपयोग केला गेला असल्यास भविष्यात याप्रकरणी चौकशी करण्यात येऊ शकते. आता मात्र अशी कोणतीही बाब उघडकीस आलेली नाही.
YES Bank | राणा कपूर यांच्या अडचणीत वाढ, मुलगी रोशनीला लंडनला जाताना विमानतळावर रोखलं
काय आहे पेन्टिंग प्रकरण?
प्रियांका गांधी वाड्रा यांचं हे पेंटिंग राणा कपूर यांनी 2010मध्ये दोन कोटी रूपयांना खरेदी केलं होतं. हे एम.एफ. हुसैन यांचं पेन्टिंग असून दे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना देण्यात आलं होतं. या पेन्टिंगचा लिलाव प्रियांका गांधी यांनी केला होचा. प्रियांका गांधी यांनी 2010मधील इनकम टॅक्स फाइलमध्येही अधिकृतपणे याबाबत माहिती दिली आहे.
2010मध्ये देशात यूपीए-2 सरकार होतं. यादरम्यान राणा कपूर यांना येस बँकेचा व्यवहार वाढवण्यासाठी आणि बिजनेस दिल्लीपर्यंत उत्तम करण्यासाठी प्रियांका गांधी यांचं पेन्टिंग खरेदी केलं होतं. या पेन्टिंगचे 2 कोटी रूपये देऊन राणा कपूर आणि येस बँक यांना तत्कालीन यूपीए सरकारच्या गुड बुकमध्ये येण्याची इच्छा होती. दरम्यान, 2014मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्याआधी येस बँकेच्या कर्जाचा आकडा 55633 कोटींवर गेला होता.
पाहा व्हिडीओ : येस बँकेचे संस्थापक राणा कपूरची मुलगी रोशनी कपूरला मुंबई विमानतळावर रोखले
खरं तर हा चौकशीचा विषय आहे की, 'प्रियांका गांधीचं पेन्टिंग खरेदी करून राणा कपूर यांना गुड बुकमध्ये सहभागी व्हायचं होतं? तसेच भविष्यात कोणत्याही व्यवहारात या संबंधांचा उपयोग करण्यात आला आहे? किंवा या पेन्टिंगच्या माध्यमातून कोणत्याही व्यक्तीला चुकीच्या पद्धतीने लाभ पोहोचवला आहे का?
कोण आहेत राणा कपूर, त्यांच्यावर काय आहेत आरोप
एमबीए झाल्यानंतर राणा कपूर 1980 साली बँक ऑफ अमेरिकेत मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून कामाला सुरुवात केली. बँक ऑफ अमेरिकेसोबत तब्बल 16 वर्ष काम केलं. 2004 साली राणा कपूर यांनी नातेवाईक अशोक कपूर यांच्या सोबत येस बँकेची स्थापना केली. 26/11 च्या हल्ल्यात बँकेचे सहसंस्थापक अशोक कपूर यांचा मृत्यू झाला. अशोक कपूर यांच्या पत्नी आणि राणा कपूर यांच्यात भागीदारीवरुन वादाला सुरुवात झाली. राणा यांनी वैयक्तिक संबंधानुसार येस बँकेतून कर्ज देण्यास सुरुवात केली. अनिल अंबानींचा समूह, सीजी पॉवर, एस्सार पॉवरसारख्या समुहांना मोठं कर्ज दिलं. 2017 साली बँकेनं 6 हजार 355 कोटींची रक्कम बॅडलोन म्हणून घोषित केली. 2018 साली राणा कपूर यांच्यावर कर्ज आणि ताळेबंदीत गडबड केल्याचा आरबीआयनं आरोप केला. त्यानंतर रिझर्व्ह बँकेनं येस बँकेवर निर्बंध लावण्यास सुरुवात केली.
संबंधित बातम्या :
Yes Bank Crisis | येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांना 11 मार्चपर्यंत ईडीची कोठडी