- पे नियरबाय अॅपचा वापर स्मार्टफोनवरही करता येईल. यामुळे काही रिटेलर्स ग्राहकांसाठी आधार-एटीएम आणि आधार बँक शाखेच्या रुपात काम करु शकतील. यातूनच कॅश जमा करणं किंवा काढण्याची सुविधा मिळेल, असं येस बँकेने म्हटलं आहे.
- ग्राहक आधार नंबर आणि फिंगरप्रिंटचा वापर करुन पैसे काढू शकतील किंवा इतर व्यवहार करता येतील.
- पे नियरबाय आधार एटीएम येस बँक आणि बिझनेस करस्पाँडंट यांच्या माध्यमातून उपलब्ध होईल. याचे जवळपास 40 हजार टच पॉईंट असतील.
ना पिनची, ना कार्डची गरज, येस बँक नवं एटीएम आणणार
एबीपी माझा वेब टीम | 06 Jan 2018 12:12 AM (IST)
येस बँकेने एका नव्या तंत्रासाठी जो करार केला आहे, त्यामुळे हे शक्य होणार आहे.
नवी दिल्ली : खासगी क्षेत्रातील येस बँक असं एटीएम आणणार आहे, जे वापरण्यासाठी ना पिनची गरज असेल, ना कार्डची. येस बँकेने एका नव्या तंत्रासाठी जो करार केला आहे, त्यामुळे हे शक्य होणार आहे. येस बँकेचा नियरबार टेकसोबत करार येस बँकेने फिनटेक क्षेत्रातील कंपनी नियरबाय टेकसोबत करार केला आहे. कार्ड आणि पिनची गरज नसणारं एटीएम ही कंपनी देणार आहे. ग्राहक रिटेलर्सकडेच पैसे जमा करु शकतील आणि तिथूनच पैसे काढूही शकतील. नियरबायने ही सेवा सुरु करण्यासाठी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाशी मिळूनही काम केलं आहे. हे एटीएम काम कसं करणार?