Worli Hit And Run Accident: मुंबई : वरळी (Worli News) हिट अँड रन प्रकरणात (Heat And Run Case) शिवसेनेच्या (Shiv Sena) शिंदे गटातील (Shinde Group) उपनेते राजेश शहा (Rajesh Shah) यांना पोलिसांनी (Mumbai Police) ताब्यात घेतलं आहे. राजेश शहा हे पालघरमधील (Palghar News) शिवसेनेचे उपनेते आहेत. अपघात (Accident Updates) झाला त्यावेळी राजेश शहा गाडीत नव्हते. मात्र, वरळीतील (Worli Heat And Run Case) हिट अँड रन प्रकरण घडलं त्यावेळी पांढऱ्या रंगाच्या बीएमडब्ल्यू (White BMW Car) गाडीत शिंदे गटातील उपनेते राजेश शहा यांचा मुलगा आणि ड्रायव्हर गाडीत होता. आरोपी मुलगा अद्याप फरार आहे. पोलिसांकडून आरोपी मुलगा आणि ड्रायव्हर दोघांचाही कसून शोध घेत आहेत. दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


पांढऱ्या BMW वर पक्षाचं चिन्ह, अपघातानंतर खोडण्याचा प्रयत्न 


वरळी पोलिसांनी हिट अॅड रन केसमध्ये एक पांढऱ्या रंगाची BMW गाडी ताब्यात घेतली आहे. ज्यावर एका पक्षाचं चिन्ह असून अपघातानंतर ते चिन्ह खोडण्याचा प्रयत्न झाल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी गाडीसोबतच संशयिताला ताब्यात घेतलं आहे. 


काय घडलं नेमकं? 


मुंबईतील वरळीत असलेल्या प्रसिद्ध अॅट्रिया मॉलजवळ हिट अँड रनची घटना घडली आहे. अॅट्रिया मॉलजवळच असणाऱ्या वरळी कोळीवाडा परिसरात राहणारं नाकवा हे कोळी दाम्पत्य सकाळी माशांच्या लिलावासाठी ससून डॉकला जाण्यासाठी घराबाहेर पडलं होतं. मासे घेऊन दुचाकीवरुन परतत असताना दाम्पत्याच्या दुचाकीला एका चारचाकी गाडीनं धडक दिली.


चारचाकी गाडीच्या चालकाने गाडी न थांबवता तशीच पळवली. त्यात त्यानं बोनेटवर पडलेल्या कोळी महिलेला फरफटत नेलं. या अपघातात नवरा थोडक्यात बचावला. मात्र महिला गंभीर जखमी झाली होती. महिलेला तात्काळ मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, तोपर्यंत फार उशीर झाला होता. डॉक्टरांनी महिलेला मृत घोषित केलं. 


पाहा व्हिडीओ : Worli Hit And Run : वरळीत 'हिट ॲण्ड रन' दुर्घटनेवेळी राजेश शहा यांचा मुलगा गाडी चालवत होता



महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Worli Heat And Run: वरळी हीट अँड रनमधील BMW वर पक्षाचं चिन्ह; अपघातानंतर खोडण्याचा प्रयत्न; नेमकं काय घडलं?