Worli Hit And Run : मुंबई : वरळी (Worli News) हिट अँड रन प्रकरणात (Hit And Run Accident) फक्त मिहीर शाहच (Mihir Shah) नाहीतर संपूर्ण शाह कुटुंब अडचणीत येण्याची शक्यता आहे. पुणे (Pune News) पोर्शे अपघात (Porshe Accident Case) प्रकरणाप्रमाणेच संपूर्ण कुटुंबाचा सहभाग असल्याचं मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) तपासात उघड झालं आहे. अपघात झाल्यानंतर आरोपी मिहीर शाहला त्याच्या वडीलांनी तिथून पळून जा, आपण सर्व आरोप ड्रायव्हरवर टाकू, असा सल्ला दिल्याचंही पोलीस तपासात उघड झालं आहे. त्यानंतर मिहीरनं तिथून पळ काढला. पोलिसांनी याप्रकरणी मिहीरच्या वडीलांना अटक करत कोर्टात हजर केलं होतं. पण कोर्टानं राजेश शाहला जामीन मंजूर केला आहे.
नेमकं काय-काय घडलं? पोलिसांनी कोर्टात सांगितलं...
पुणे पोर्शे प्रकरणात ज्या पद्धतीनं संपूर्ण कुटुंबाचा सहभाग असल्याचं उघड झालं होतं, त्याचप्रमाणे वरळी हिट अँड रन प्रकरणातही संपूर्ण कुटुंबाचा सहभाग असल्याचं उघड झालं आहे. वरळी 'हिट अँड रन' प्रकरणातही अपघातानंतर मिहीर शाहला त्याचे वडील राजेश शाह यांनी पळून जाण्याच्या सूचना दिलेल्या. त्यानंतर मिहीरनं गोरेगाव परिसरात राहणाऱ्या त्याच्या गर्लफ्रेंडचं घर गाठलं. तिच्या घरी जाण्यापूर्वी त्यानं तिला 30 हून अधिक फोन केले. गर्लफ्रेंडच्या घरी पोहोचल्यावर तिला घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर तो दोन तास तिथेच झोपला. गर्लफ्रेंडनं मिहीर तिच्या घरी आल्याची माहिती फोन करुन त्याच्या घरी आई आणि बहिणीला दिली. ते समजताच आई आणि बहिणीनं गर्लफ्रेंडचं घर गाठलं. तिथून मिहीरला घेऊन त्या दोघी बोरिवलीला गेल्या. बोरीवलीच्या घराला कुलूप लावून मिहीर, आई आणि बहिणीसह पळून गेल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. त्यामुळे याप्रकरणी मिहिरची आई आणि बहिणीलाही पोलीस आरोपी करण्याची शक्यता आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे, पोलीस तपासात मिहीरचा मोबाईल पश्चिम द्रूतगतीमार्गावर कांदिवली-बोरिवली दरम्यान बंद केल्याचं समोर आलं आहे. तेच त्याचं शेवटचं लोकेशन असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं आहे. या प्रकरणी वरळी पोलिसांनी मिहीरच्या मैत्रिणीचाही जबाब नोंदवला आहे.
तिथून पळ, सगळं ड्रायव्हरनं केलंय सांगू; वडीलांचा मिहीरला वाचवण्यासाठी प्लान
पुणे पोर्शे प्रकरणाप्रमाणे, वरळी 'हिट अॅड रन' प्रकरणातही मुख्य आरोपी मिहीरला त्याचे वडील आरोपी शिवसेना उपनेते राजेश शहा यांनी 'तू पळून जा, अपघात ड्रायव्हरनं केला आहे असं सांगू, असा सल्ला दिला होता, अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. तसेच, वांद्रे येथे मिहीरची गाडी बंद पडल्यानंतर आरोपी राजेश शहा यांनी गाडीची नंबरप्लेट बदलण्याचा आणि गाडीवरील स्टिकर खोडल्याचं तपासात समोर आलं आहे. या प्रकरणातील मुख्यआरोपी मिहीर शाह हा अद्याप फरार असून मिहीर शाहच्या शोधासाठी मुंबई पोलिसांनी 11 पथकं स्थापन केली आहेत. याशिवाय गुन्हे शाखाही मिहीरचा शोध घेत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :