बाबा रामदेव या पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले की, जे लोक योगाभ्यास करतात, त्यांचे चांगले दिवस येतात. या पत्रकार परिषदेत रामदेव बाबांनी योगाला आंतरराष्ट्रीय पातळीवर लोकप्रिय केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले. तर गांधी घराण्यावर टीकादेखील केली.
बाबा रामदेव यावेळी म्हणाले की, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी योगाभ्यास करत नाहीत, त्यामुळेच त्यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. मोदीजी खुलेआम योगाभ्यास करतात. परंतु माजी पंतप्रधान पंडित नेहरु आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी या लपून छपून योगभ्यास करायचे. परंतु त्यांच्या पुढच्या पिढीने योगाकडे दुर्लक्ष केले, त्यामुळे त्यांच्याकडून राजकारणात गडबड झाली. योगाभ्यासाकडे दुर्लक्ष केल्यामुळेच त्यांना निवडणुकीत अपयश आले.
पाहा काय म्हणाले बाबा रामदेव
यावेळी रामदेवब बाबा म्हणाले की, 21 जून रोजी (आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत नांदेड येथे आयोजित कार्यक्रमात सहभागी होणार आहे. तसेच पतंजलीतर्फे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त संपूर्ण भारतातील 1 लाख गावांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहेत.
बाबा रामदेव बाबा म्हणाले की, लोकांनी योगाकडे धर्म आणि प्रथेच्या नजरेतून पाहू नका. योगाभ्यास हे आपल्या पुर्वजांनी आपल्याला दिलेले ज्ञान आहे.