मुंबई : टवाळखोरांकडून आपल्या मुलीला सातत्याने होणाऱ्या त्रासाला कंटाळून आईने पोलिस ठाण्यात धाव घेतली. मात्र पोलिसही तक्रार दाखल करुन घेत नसल्याने आईने पोलिस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न केला. मुंबईतील विक्रोळी पार्कसाईट पोलिस ठाण्यात ही घटना घडली.
शीला मोर्या असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या या महिलेचे नाव असून, ती विक्रोळी पार्कसाईटच्या वर्षानगर भागात राहते. त्यांची मुलगी सुषमा हिला याच विभागातील सनी बोरडे आणि संतोष निगडेकर वारंवार छेडत असत. अश्लील शिविगाळही करीत असत. गेले अनेक दिवस हा प्रकार सुरु होता.
या बाबत पार्कसाईट पोलीस ठाण्यात वारंवार खेटा घालूनही कारवाई होत नसल्याने अखेर या तरुणीच्या आईने पोलीस ठाण्यातच औषध प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
सध्या शीला मोर्या यांच्यावर राजवाडी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.
आरोपी काही तासातच सुटले!
या प्रकरणात पार्कसाईट पोलिसांनी या महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर अखेर तक्रार नोंदविली आणि आरोपी सनी आणि संतोषला बेड्या ठोकल्या खऱ्या, परंतु कलमे अशी लावली की अवघ्या काही तासातच त्यांची जामिनावर मुक्तताही झाली.
या प्रकरणात पोलिसांनी आरोपींना अटक केली, अशी माहिती जरी दिली असली, तरी या महिलेलेला पोलीस ठाण्यात आत्महत्या करण्याची वेळ का आली, याबाबत मात्र मौन धारण केलं आहे.
सध्या शीला मोर्या यांच्यावर राजावाडी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. न्याय मिळावा म्हणून एका आईला एवढे टोकाचे पाऊल उचलावे लागते, ही बाब गंभीर असून, यावर गृहखाते काही कारवाई करणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.
मुंबईत पोलिस ठाण्यातच महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
29 Jan 2018 09:07 PM (IST)
पार्कसाईट पोलिसांनी या महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर अखेर तक्रार नोंदविली आणि आरोपी सनी आणि संतोषला बेड्या ठोकल्या खऱ्या, परंतु कलमे अशी लावली की अवघ्या काही तासातच त्यांची जामिनावर मुक्तताही झाली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -