एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 29.01.2018


1.    मंत्रालयात विष प्राशन केलेल्या धर्मा पाटील यांचा मृत्यू, लेखी आश्वासनानंतर धर्मा पाटील यांचं पार्थिव कुटुंबीयांच्या ताब्यात, सरकारकडून 30 दिवसात मोबदल्याचं आश्वासन https://goo.gl/pGcPqC

2.    धुळ्याचे पालकमंत्री जयकुमार रावलांच्या सांगण्यावरुनच धर्मा पाटलांच्या जमिनीच्या मिटिंग्स रद्द झाल्या, राष्ट्रवादीचा गंभीर आरोप, तर जमीन संपादनाचं काम आघाडी सरकारच्या काळातलंच, रावलांनी आरोप फेटाळले https://goo.gl/K6B1MB

3.    मृत्यूनंतर मोबदल्याची भाषा करणाऱ्यांनी स्वतः विष प्यावं, बावनकुळेंवर राजू शेट्टींचं टीकास्त्र, तर सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची संजय राऊतांची मागणी https://goo.gl/DUZX25

4.    2018-19 मध्ये विकासदर 7.5 टक्के गाठण्याचा अंदाज, अर्थमंत्री अरुण जेटलींकडून संसदेत आर्थिक पाहणी अहवाल सादर, मात्र इंधनाच्या वाढत्या दरांमुळे चिंता कायम https://goo.gl/WyAGYr

5.    पुण्यात आयटी कंपनीत काम करणाऱ्या 22 वर्षीय तरुणीची आत्महत्या, सातव्या मजल्यावरुन उडी टाकून आयुष्य संपवलं, आत्महत्येचं कारण अस्पष्ट https://goo.gl/Bgwk2Q

6.    मुंबईजवळील भिवंडीत रजिस्टर पोस्टाने महिलेला ‘तिहेरी तलाक’, पीडित महिलेची सासरच्या पाच जणांविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार https://goo.gl/U23fTG

7.    लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्रित होण्यासाठी एकमत व्हावं, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून अपेक्षा व्यक्त https://goo.gl/meqQSM

8.    देशातील आर्थिक विषमता दूर करण्यासाठी श्रीमंत खासदारांचं वेतन थांबवा, लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्याकडे पत्राद्वारे खासदार वरुण गांधींची मागणी https://goo.gl/mUVpGx

9.    समविचारी पक्षांची मोट बांधणाऱ्या पवारांचं राजकीय चारित्र्य तपासावं लागेल, प्रकाश आंबेडकरांचा शरद पवारांवर निशाणा https://goo.gl/x5QD7C

10.    पंचायत राजची परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्यांनाच चेक आणि सह्यांचा अधिकार, आदर्श ग्राम योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवारांची माहिती, 3500 सरपंचांना खास प्रशिक्षण देणार https://goo.gl/wUtqHT

11.    मी साक्षीदार, न्यायमूर्ती लोयांना 100 कोटींची ऑफर होती, लोयांच्या दोन न्यायाधीश मित्रांचीही हत्या, मा. न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांचा खळबळजनक दावा https://goo.gl/cAqKfi

12.    होर्डिंगवर भाऊ, दादा, साहेब विशेषणं लावल्यास पक्षाकडून कारवाई करु, नेतेपदी निवडीनंतर आदित्य ठाकरेंची शिवसैनिकांना तंबी https://goo.gl/uskAy6

13.    टॅटू असल्यास वायूसेनेत नोकरी मिळणार नाही, दिल्ली हायकोर्टाचं फर्मान, आदिवासींच्या परंपरागत टॅटूंना मात्र परवानगी https://goo.gl/RBjqfW

14.    होंडाने तब्बल 22,834 कार परत मागवल्या, 2013 साली तयार करण्यात आलेल्या गाड्यांमधील एअरबॅगमध्ये बिघाड https://goo.gl/E8aUYm

15.    ‘पद्मावत’ची रेकॉर्डब्रेक कमाई, पहिल्याच वीक एन्डमध्ये 100 कोटींचा आकडा पार https://goo.gl/7EWnxm

BLOG : प्रसिद्ध ब्लॉगर समीर गायकवाड यांचा ब्लॉग - 'जाग्रणा'तली गोडी... https://goo.gl/zKUqAm

एबीपी माझाचे अपडेट सुपरफास्ट मिळवण्यासाठी फेसबुकवर हा छोटा बदल करा https://goo.gl/NzW5bs   

एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ - https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा