नजमा अहमद शेख असे या महिलेचे नाव असून ती माहीमच्या जनता सेवक सोसायटीमध्ये राहते. घाटकोपर युनिटच्या पोलीस निरीक्षक लता सुतार यांना ही महिला एमडी विक्री करण्यास येणार असल्याची माहिती मिळाली होती. यावरून घाटकोपर युनिटने सापळा रचून तिला अटक केली. तिच्याकडून त्या ठिकाणी 100 ग्रॅम एमडी ज्याची किंमत 10 लाख इतकी असून रोख रक्कम 20 हजार रुपये देखील मिळाली. तसेच पोलिसांनी तिच्या कुर्ला येथील घरी झडती घेतली असता त्यांना 2 किलो 700 ग्रॅम चरस ज्याची किंमत 54 लाख इतकी असून रोख रक्कम 9 लाख 45 हजार रुपये सापडले आहेत.
या महिलेकडून पोलिसांना एकूण 76 लाख 65 हजार रुपयांचे ड्रग्ज आणि रोख रक्कम मुद्देमाल हाती लागला आहे. ही महिला मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणत ड्रग्जची विक्री आणि पुरवठा करीत होती. तिने इतक्या मोठ्या प्रमाणत ड्रग्ज कुठून आणले होते? ते कोणाला विक्री करीत होती? याचा तपास अंमली पदार्थ विरोधी पथक करीत आहेत.
संबंधित बातम्या :
मुंबईतील 'खूनी' न्यू ईयर पार्टीचा ड्रग अँगल समोर, आरोपीनं ड्रग्जचं सेवन केल्याचं चौकशीत उघड