मुंबई : अहमदनगरला नेऊन पतीची हत्या करणाऱ्या महिलेला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. कट रचून हत्या केल्याप्रकरणी महिलेसह तिची बहीण आणि बहिणीच्या प्रियकरालाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

आशा वानखेडे, वंदना वानखेडे आणि सुनिल अशी अटक झालेल्या तीन आरोपींची नावं आहेत. तब्बल वर्षभरापूर्वी बेपत्ता झालेल्या प्रकाश वानखेडेची हत्या झाल्याचं पोलिस तपासात निष्पन्न झालं होतं.

बहिणीच्या घरी कार्यक्रमाच्या बहाण्याने आशाने प्रकाशला अहमदनगरच्या पारनेरमध्ये बोलावलं. तिथं त्याची हत्या करुन मृतदेह 27 किलोमीटर लांब जंगलात फेकून दिला.

मुंबईत परत आल्यानंतर पती बेपत्ता असल्याची तक्रार तिने दाखल केली. पण वर्षभर कोणताही सुगावा लागला नाही. वर्षभर पाळत ठेवल्यानंतर अखेर पोलिसांनी तिघांना अटक केली आणि हत्येचं गूढ उलगडलं.