मुंबई : राज्यपालनियुक्त विधानपरिषदेच्या 12 आमदारांच्या निवडीसाठी पाठवलेली यादी 21 नोव्हेंबरपर्यंत मंजूर करावी, अशी विनंती राज्य सरकारने राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना केली होती. त्याची मुदत आज संपत असताना महाविकास आघाडी सरकारने पाठवलेल्या या यादीला राज्यपाल मंजुरी देणार की आक्षेप घेणार याबाबत उत्सुकता आहे.


12 पैकी 8 नावांना आक्षेप घेत मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामधील एकनाथ खडसे, राजू शेट्टींसह आठ नावांना आक्षेप घेण्यात आला आहे. त्यावर 24 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे. त्यातच राज्य सरकारने केलेल्या विनंतीनुसार राज्यपालांनी आज निर्णय घेतला नाही तर सरकार कोणतं पाऊल उचलणार हे पाहणं देखील औत्सुक्याचं असेल.


महाविकास आघाडी सरकारकडून 6 नोव्हेंबर रोजी विधानपरिषदेसाठीच्या 12 नावांचा प्रस्ताव राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना देण्यात आला होता. शिवसेनेचे अनिल परब, राष्ट्रवादीचे नवाब मलिक आणि काँग्रेसचे अमित देशमुख यांनी यासंदर्भात राज्यपालांची भेट घेऊन बारा नावांची यादी सोपवली. यासोबत 21 नोव्हेंबरपर्यंत यादी मंजूर करावी अशी विनंतीही करण्यात आली होती.


महाविकास आघाडीकडूने देण्यात आलेली 12 नावे


राष्ट्रवादी काँग्रेस
एकनाथ खडसे (समाजसेवा आणि सहकार)
राजू शेट्टी (सहकार आणि समाजसेवा)
यशपाल भिंगे (साहित्य)
आनंद शिंदे (कला)


काँग्रेस
रजनी पाटील (समाजसेवा आणि सहकार)
सचिन सावंत (समाजसेवा आणि सहकार)
मुझफ्फर हुसेन (समाजसेवा)
अनिरुद्ध वनकर (कला)


शिवसेना
उर्मिला मातोंडकर (कला)
नितीन बानगुडे पाटील
विजय करंजकर
चंद्रकांत रघुवंशी


संबंधित बातम्या


विधानपरिषदेसाठी महाविकास आघाडीकडून राज्यपालांना 12 नावांचा प्रस्ताव, दोन नावे विशेष


'श्रद्धा और सबुरी', विधानपरिषदेसाठी नाव नसल्याने सत्यजित तांबे यांचं सूचक ट्वीट