मुंबई : विधानपरिषदेसाठी राज्यपालांकडे पाठवण्यात आलेल्या 12 नावांमध्ये महाराष्ट्र युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजीत तांबे यांचं नावं नाही. सत्यजीत तांबे यांनी आपल्या ट्विटर हॅण्डलवर 'श्रद्धा और सबुरी' असं ट्वीट केलं आहे. या सूचक ट्विटमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या वेळी सुजय विखे पाटील यांच्या जागेवरुन वाद सुरु होता तेव्हाही सत्यजीत तांबे यांनी हेच ट्वीट केलं होतं.
सत्यजीत तांबे यांचे वडील हे नाशिक पदवीधर मतदारसंघातून सध्या विधानपरिषदेचे आहेत आहे. तर त्यांचे मामा बाळासाहेब थोरात हे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असून राज्याचे महसूल मंत्रीही आहेत
दरम्यान महाविकास आघाडीकडून काल (6 नोव्हेंबर) राज्यपालनियुक्त विधानपरिषदेसाठीच्या 12 नावांचा प्रस्ताव राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना देण्यात आला आहे. शिवसेनेच अनिल परब, राष्ट्रवादीचे नवाब मलिक आणि काँग्रेसचे अमित देशमुख यांनी या संबंधी राज्यपालांची भेट घेतली. आज दिलेल्या बारा नावात दोन नावे विशेष आहेत.
काँग्रेसमध्ये वाद?
विधानपरिषदेसाठी राज्यपाल नियुक्त नावं जाहीर होताच काँग्रेसमध्ये वाद उफाळून आला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे १२ जणांच्या या यादीत वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवलेल्या दोघांना स्थान देण्यात आलं आहे. वंचितकडून निवडणूक लढवणाऱ्या अनिरुद्ध वनकर यांच्या उमेदवारीला विदर्भ काँग्रेसने विरोध केला आहे. तर नांदेडमधून अशोक चव्हाण यांच्याविरुद्ध लोकसभा निवडणूक लढवलेले वंचितचे उमेदवार यशपाल भिंगे यांना राष्ट्रवादीत संधी दिल्याने त्यांचीही चर्चा सुरु आहे. शिवसेनेने विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेसमधून आलेल्या नंदुरबारमधील चंद्रकांत रघुवंशी यांची वर्णी लावली आहे. पण वंचितच्या उमेदवाराला संधी दिल्याने विदर्भ काँग्रेसमधील असंतोष जाहीरपणे समोर आला आहे.
महाविकास आघाडीकडूने देण्यात आलेली 12 नावे
राष्ट्रवादी काँग्रेस
एकनाथ खडसे (समाजसेवा आणि सहकार)
राजू शेट्टी (सहकार आणि समाजसेवा)
यशपाल भिंगे (साहित्य)
आनंद शिंदे (कला)
काँग्रेस
रजनी पाटील (समाजसेवा आणि सहकार)
सचिन सावंत (समाजसेवा आणि सहकार)
मुझफ्फर हुसेन (समाजसेवा)
अनिरुद्ध वनकर (कला)
शिवसेना
उर्मिला मातोंडकर (कला)
नितीन बानगुडे पाटील
विजय करंजकर
चंद्रकांत रघुवंशी
संबंधित बातम्या
विधानपरिषदेसाठी महाविकास आघाडीकडून राज्यपालांना 12 नावांचा प्रस्ताव, दोन नावे विशेष
Vidhan Parishad | विधानपरिषदेच्या 12 नावांचा प्रस्ताव राज्यपालांकडे! राज्यपाल प्रस्ताव स्वीकारणार?