मुंबई : रेल्वेनंतर बेस्ट ही मुंबईकरांची दुसरी लाईफलाईन आहे. गेल्या सात दिवसांपासून बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये बेस्ट संपावरुन चर्चा, बैठकांची सत्र सुरु आहेत. परंतु आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेल्या बेस्टची पूर्णत: जबाबदारी घ्यायला महापालिका आणि राज्यसरकार दोघेही सध्या तयार नाहीत.

मुंबईसह इतर शहरांमधील सार्वजनिक बस वाहतूक सेवाही धोक्यात आहेत. ठाणे, कल्याण-डोंबिवली, पुणे, नागपूर या महत्वाच्या शहरांमधल्या सार्वजनिक बस सेवा तग धरुन आहेत. परंतु बेस्टचं चुकतंय कुठं? हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.

इतर शहरांमधल्या बसेस या महापालिका, खाजगीकरण, राज्य सरकारचे अनुदान यांच्या आधारावर उभ्या आहेत. परंतु बेस्टला उभं राहायला सध्या महापालिका किंवा राज्य सरकारचा कोणताच टेकू उपलब्ध नाही. त्यामुळे बेस्टची वाताहत होत आहे.

मुंबईतील बेस्टची स्थिती
1. बेस्टच्या डोक्यावर सध्या अडीच हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे
2. बेस्टला महिन्याला सुमारे 200 कोटी रुपयांचा तोटा होतो.
3. दर महिन्याला कर्मचाऱ्यांचे पगार भागवण्यासाठी कर्ज काढावे लागते.
4. परिवहन विभागाचे एका दिवसाचे उत्पन्न 3 कोटी तर खर्च 6 कोटी रुपये इतका आहे.
5. 2018-19 या आर्थिक वर्षात 769 कोटींच्या तुटीचा अर्थसंकल्प,
6. बेस्टला वीजचोरी आणि वीजगळतीमुळे 200 कोटींचा तोटा होत आहे.
7. बेस्टला पर्याय असणाऱ्या मेट्रो, ओला-उबेरसारख्या जलदगती वाहतूक सुविधांमुळे बेस्टची प्रवासी संख्या घटली.

इतर महापालिकेतील सार्वजनिक वाहतूक सुविधाही थोड्या फार फरकाने तोट्यातच आहेत. परंतु त्या ठिकाणच्या महापालिकेने मुंबई महापालिकेसारखे हात झटकलेले नाहीत.

संबधित बातम्या

बेस्ट संप : जनतेला वेठीस धरणं चुकीचं, हायकोर्टाने खडसावलं

बेस्ट संपात मनसेची उडी, कोस्टल रोड आणि मेट्रो 3 विरोधात आंदोलन