मुंबई : त्रिपुरातील (Tripura) कथित हिंसाचाराचे पडसाद महाराष्ट्रात (Maharashtra) उमटत आहेत. अमरावती (Amravati) जिल्ह्यात पुकारण्यात आलेल्या बंदला हिंसक वळण लागलं. अमरावतीत दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आली. त्यादरम्यान पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला. अमरावतीप्रमाणे नांदेड आणि मालेगावातही त्याचे पडसाद उमटले. दरम्यान, अमरावतीतील हिंसाचारानंतर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी वसीम रिझवी (Syed Waseem Rizvi) यांचं नाव घेतलं आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी नवाब मलिक यांनी केली आहे. वसीम रिझवी हे शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष आहेत. 


नवाब मलिक म्हणाले, "वसीम रिझवी शिया वक्फ बोर्डाचे चेअरमन होते, त्यांनी अफरातफरी केली. 2016-17 मध्ये त्यांच्याविरोधात तक्रार झाली. त्यामुळे त्यांच्याविरोधात लखनऊमध्ये अनेक तक्रारी झाल्या. ते लखनऊचे खासदार असताना मोदी साहेब, राजनाथ सिंह साहेबांकडे तक्रारी करण्यात आल्या. एक वर्षापूर्वी हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आलं. मात्र पुढे काय झालं माहिती नाही. वसीम रिझवींवर तात्काळ कारवाई करावी, देशातील शांतता बिघडेल असं वातावरण त्यांनी निर्माण करु नये, तसं लिखाण त्यांनी करु नये, जे कोणी या हिंसेला जबाबदार असेल त्यावर कारवाई करावी"


वसीम रिझवी गेल्या दोन चार वर्षापासून या देशातील सलोखा कसा बिघडेल अशी विधानं करत आहेत, काही पुस्तक लिहित आहेत. लोकांच्या भावना भडकवत आहेत. मात्र त्यांच्यावर कारवाई होत नाही. नियोजन पद्धतीने देशातील वातावरण कसं बिघेडल हे वसीम रिझवीच्या माध्यमातून सुरु आहे, असं नवाब मलिक म्हणाले. 


हिंसेचा निषेध, शांतता राखा


त्रिपुरात जी हिंसा झाली, त्याच बरोबर शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या निषेधार्थ बंद पुकारण्यात आला होता, यादरम्यान महाराष्ट्रातही बंद पुकारण्यात आला होता. मात्र बंदनंतर तीन जागी हिंसा झाली. या हिंसेचा आम्ही कठोर शब्दात निंदा करतो.  ज्या संघटना लोकांना असं आवाहन करत आहेत, त्यांची जबाबदारी असते की आंदोलन किंवा निषेध दर्शवणे हा लोकांचा अधिकार आहे, पण अनगाईडेड मिसाईलसारखं त्यावर नियंत्रण नसणं योग्य नाही, असं  नवाब मलिक म्हणाले.


कोण आहेत वसीम रिझवी?



  • वसीम रिझवी हे उत्तर प्रदेशातील शिया वक्फ बोर्डाचे माजी चेअरमन आहेत 

  • वर्ष 2000 मध्ये ते समाजवादी पक्षाकडून नगरसेवक म्हणून निवडून आले  

  • 2008 मध्ये शिया वक्फ बोर्डाचे सदस्य झाले 

  • मात्र या काळात त्यांनी पैशांची अफरातफर केल्याचा आरोप झाला 

  • त्यामुळे 2012 मध्ये त्यांना सपाने पक्षातून निलंबित केलं 


वसीम रिझवी आणि वाद 


वसीम रिझवी आणि वाद हे समीकरण आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे, त्यांच्या लिखाणामुळे अनेकवेळा धार्मिक तेढ निर्माण झाले. वसीम रिझवी यांना मुस्लिमविरोधी म्हणून संबोधलं गेलं. अनेक मौलानांनी वसीम यांना मुस्लिम धर्मातून बेदखल करत असल्याचं जाहीर केलं होतं. मात्र आपण खरे मुस्लिम आहोत, असं वसीम रिझवी वारंवार सांगतात 


वसीम रिझवी यांची यापूर्वीची वक्तव्ये 



  • - भारतात मदरशांना बंदी घालावी, त्यामुळे दहशतवादाच्या निर्मितीला चाप लागेल 

  • - बाबरी मशीद म्हणजे हिंदुस्थानच्या धरतीवर कलंकासारखी 

  • - चांद-ताऱ्याचा हिरवा झेंडा इस्लामचा धार्मिक झेंडा नाही 

  • - जनावराप्रमाणे मुलं जन्माला घालणं देशासाठी घातक, लोकसंख्या नियंत्रण आवश्यक 


संबंधित बातम्या  


Maharashtra Protest Live UPDATES : त्रिपुरातील हिंसाचारांनंतर महाराष्ट्रात तणाव, वाचा प्रत्येक अपडेट


दंगली घडवून सरकार अस्थिर करण्याचं कारस्थान, राज्यपाल राजवटीचा खेळ हाणून पाडू : संजय राऊत