St Workers Strike :  एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज सातवा दिवस आहे. विलीनीकरणाच्या मागणीसाठी ठाम असणाऱ्या एसटीच्या कर्मचाऱ्यांचं आंदोलन आणखी तीव्र होणार आहे. आंदोलक कर्मचारी आज परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घरावर धडकणार आहेत. संपकरी परिवहन मंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढून संताप व्यक्त करणार आहेत. अनिल परबांनी पुन्हा एकदा एसटी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचं आवाहन केलं आहे. तसंच सदाभाऊ खोत आणि पडळकर कर्मचाऱ्यांना भडकवण्याचं काम करतायत असंही अनिल परबांनी म्हटलं आहे. काल रात्री विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आझाद मैदानात उपस्थित राहून आंदोलकांना पाठिंबा दर्शवला. दुसरीकडे काल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी काल शरद पवारांची भेट घेतली आहे.. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात त्यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. 


दुसरीकडे वारंवार आवाहन करुनही कर्मचारी कामावर येत नाहीय. त्यामुळं आता हा संप मोडीत काढण्याची तयारी राज्य सरकारनं सुरु केली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी आगारातून खासगी बस, शालेय बस आणि वडाप सोडल्या जात आहेत. विविध डेपोतून शिवशाही बस मार्गस्थ झाल्यात. या बसेसना पोलीस संरक्षणही देण्यात आलं. तसंच खासगी बसचालकांची मदत घेऊनही एसटी सुरु करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. दरम्यान, अनेक कर्मचारी कामावर रुजू होण्यास तयार असल्याचा दावा एसटी महामंडळाने केला आहे. यासाठी कर्मचाऱ्यांना संरक्षण दिले जाईल, असे आश्वासनही परिवहन मंत्र्यांनी दिलंय.  


एसटी कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीसाठी गेल्या सात दिवसांपासून संपावर ठाम आहेत. वारंवार आवाहन करुनही कर्मचारी कामावर येत नाहीय. त्यामुळं आता हा संप मोडीत काढण्याची तयारी राज्य सरकारनं सुरु केली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी आगारातून खासगी बस, शालेय बस आणि वडाप सोडल्या जात आहेत. 


गेल्या सात दिवसांपासून एसटी कर्मचारी मुंबईतल्या आझाद मैदानावर आंदोलन करताहेत. या आंदोलनाचं नेतृत्व करणारे भाजपचे नेते गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत देखील आझाद मैदानावर तळ ठोकून आहेत. गेले सात दिवस आझाद मैदानातल्या त्यांच्या दिवसाची सुरुवात घोषणाबाजीनं होतेय. मात्र आजचा दिवस त्याला अपवाद ठरलाय.  आज भाजप नेते संपकऱ्यांसोबत योगासनं केली.