मुंबई नवसाला पावणारा अशी ख्याती असलेला आणि जगभरात प्रसिद्ध असलेल्या लालबागच्या राजाचे (Lalbaugcha Raja)  आणि अंबानी कुंटुंबाचे  खास नाते आहे. दरवर्षी संपूर्ण अंबानी कुटुंब न चुकता गेली अनेक वर्षे राजाच्या दर्शनसाठी येतात. यंदा तर   रिलायन्स समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी (Mukesh Ambani)  यांचे धाकटे चिरंजीव अनंत अंबानी (Anant Ambani)  यांची मानद सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या दहा दिवसात अनंत अंबानी यांनी देखील अनेक पाच वेळा लालबागच्या राजाला भेट दिली. दरम्यान एबीपी माझाशी बोलताना अनंत अंबानी म्हणाले,  राजाची सेवा करण्याची संधी फार कमी लोकांना मिळते परंतु मी माझे सौभाग्य मानतो की मला सेवा करण्याची संधी मिळाली. 


अनंत अंबानी म्हणाले,  यंदाचा गणेशोत्सव उत्सावात पार पडत असून नेहमीप्रमाणे यंदाही शान लालबागच्या राजाची आहे. आपल्या सगळ्यांवर राजाची कृपा आहे. विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेले सगळे राजाचे भक्त आहे, त्यांचे राजावर प्रेम आहे.  राजामुळेच  आज आपण आहोत. लहानपणापासूनच मी लालबागच्या राजाचा भक्त आहे. मला 20 वर्ष झाले मी न चुकता राजाचे दर्शन घेतो. लालबागच्या राजाची प्रतिमा  ही अद्भूत आहे. राजाची सेवा करण्याची संधी फार कमी लोकांना मिळते परंतु मी माझे सौभाग्य मानतो की मला सेवा करण्याची संधी मिळाली. 


लालबागच्या राजाला काय मगितले, अनंत अंबानी म्हणाले...


यंदा लालबागच्या राजाकडे काय मागितलं असे विचारले असता अनंत अंबानी म्हणाले,  दरवर्षी मला लालबागच्या राजाची सेवा करण्याची संधी मिळावी.  सर्वांवर देवाची कृपा असू दे आणि सगळ्यांना आनंदी,  चांगले आरोग्य लाभू दे.  


लालबागच्या राजाला 20 कोटीचा सुवर्ण मुकूट


अनंत अंबानी यांची मानद सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.  गणोशोत्सवापूर्वी  झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी एकमतानं हा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे. अंबानी कुटुंबाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानाची दखल घेत मंडळानं हा निर्णय घेतला त आहे.लालबागच्या राजाला अनंत अंबानी यांनी वीस किलो सोन्याचा मुकुट अर्पण करण्यात आला. ज्याची किंमत तब्बल 15 कोटी रुपये आहे.  




हे ही वाचा :


पुण्यात विसर्जन मिरवणूक रखडली; मंडई , शारदा गणपती, भाऊसाहेब रंगारी मंडळाचं विसर्जन बाकी