मुंबई : मुंबईत मतदानाच्या दिवशी बीएमसीचे कर्मचारी निवडणूक ड्युटीवर असल्यानं काही भागांत पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे. 28 आणि 29 एप्रिला रोजी हा पाणी पुरवठा बंद करण्यात येणार आहे. मात्र याठिकाणी पाणीपुरवठा सुरु ठेवण्याबाबत मुंबई महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी आयुक्तांना पत्र लिहिलं आहे.
मुंबई महापालिकेच्या एफ उत्तर विभागातील के.डी गायकवाड नगर आणि बीएमसी वसाहतीतील रहिवाशांना मुंबईत मतदानाच्या एक दिवस आधी आणि मतदानाच्या दिवशी म्हणजेच 28 आणि 29 एप्रिलला पाणीपुरवठा होऊ शकणार नाही, असं वॉर्ड ऑफिसकडून स्थानिक नगरसेवकांना कळवण्यात आलं आहे.
मॅकेनिकल इंजिनीअरिंग विभागाचे जे कर्मचारी वॉटर पंप चालू करतात, त्यांना लोकसभा निवडणूकीची ड्युटी लावण्यात आली आहे. त्यामुळे, पंप चालू करण्यास कर्मचारी नसल्याने या भागात दोन दिवस पाणी पुरवठा बंद राहील, असं पत्राद्वारे कळवण्यात आलं आहे.
मात्र मतदान असलं तरी पाणीपुरवठ्याची जीवनावश्यक सेवा सुरु ठेवावी, असं पत्र स्थानिक नगरसेवक आणि विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी आयुक्त अजॉय मेहतांना दिलं आहे.
VIDEO | पुण्यात मतदान का कमी झालं?, पुणेकरांची कारणं ऐका ! | एबीपी माझा