मुंबई : मुंबईतील काही ठिकाणी उद्या म्हणजेच 11 नोव्हेंबर रोजी पाणी पुरवठा होणार नाही. जलवाहिनी दुरुस्तीच्या कामासाठी सकाळी 10 ते रात्री 8 दरम्यान पाणी पुरवठा बंद राहिल. तर 12 नोव्हेंबर रोजी कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. त्यामुळे पाणी जपून वापरावं असं आवाहन मुंबई महापालिकेच्या वतीने करण्यात आलं आहे.


मुंबई महानगरपालिकेतर्फे 1800 मिमी व्‍यासाच्‍या मुख्‍य जलवाहिनीमध्ये सुमननगर जंक्‍शनजवळ गळती झाल्याचं आढळून आलं होतं. ही गळती बंद करण्‍याचे काम 11 नोव्‍हेंबर 2020 रोजी सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेमध्‍ये हाती घेण्‍यात येणार आहे. त्यामुळे काही महापालिकेच्या सात विभागांमधील काही परिसरात पाणीपुरवठा बंद राहिल. तसंच 12 नोव्‍हेंबर 2020 रोजी काही विभागात पाणीपुरवठा कमी दाबाने होईल, असं महापालिकेतर्फे सांगण्यात आलं आहे.


नागरिकांनी कामाच्‍या आधीच्‍या दिवशी म्‍हणजेच आज आणि उद्या पाण्‍याचा साठा करुन ठेवावा तसंच पाणी पुरवठा सुरळीत होईपर्यंत पाण्याचा जपून वापर करावा, असं आवाहन मुंबई महापालिकेने केलं आहे. याशिवाय नागरिकांनी या दोन्‍ही दिवशी रोजी पाणी गाळून आणि उकळून प्‍यावे, असंही महापालिकेने म्हटलं आहे.


कोणकोणत्या विभागात पाणी पुरवठा बंद आणि कमी दाबाने पाणी पुरवठा?


एम पूर्व : ट्रॉंबे निम्‍नस्‍तर जलाशयावरील सी.जी. गिडवाणी मार्ग, रामकृष्‍ण चेंबूरकर मार्ग, सह्याद्री नगर, कस्‍तुरबा नगर, अजिज बाग, अयोध्‍या नगर, म्‍हाडा कॉलनी, भारत नगर, आणिक गाव, विष्‍णू नगर, प्रयागनगर आणि गवाण पाडा


एम पश्चिम : साई बाबा नगर, शेल कॉलनी, सिध्‍दार्थ कॉलनी, पोस्‍टल कॉलनी, एचपीसीएल, बीपीसीएल, आरसीएफ, बीपीटी, टाटा पावर, रामकृष्‍ण चेंबूरकर मार्गावरील मारवाली चर्च, आंबापाडा, माहूल गाव, म्‍हैसुर कॉलनी, वाशी गाव, माहूल पीएपी, मुकुंद नगर एसआरए, लक्ष्‍मी नगर, कलेक्‍टर कॉलनी, सिंधी सोसायटी, चेंबुर कॅंम्‍प तसेच चेंबुर नाका ते सुमननगर मधील सायन-ट्रॉबे मार्गालगतचा भाग


एफ दक्षिण : परळ गाव, शिवडी पश्चिम आणि पूर्व, हॉस्पिटल झोन, काळे वाडी


एफ उत्तर : कोकरी आगार, ऍन्टोपहील, वडाळा, गेट क्र. ४, कोरबा मिठागर, बीपीटी


बी विभाग : डोंगरी ए झोन, वाडी बंदर, सेंन्‍ट्रल रेल्‍वे झोन, बीपीटी झोन,


ई विभाग : डॉकयार्ड झोन, हाथीबाग व हुसैन पटेल मार्ग आणि माऊंट रोड झोन, जे.जे. हॉस्पिटल


ए विभाग : नेवल डॉक आऊटलेट झोन, सेंट जॉर्ज हॉस्पिटल