वसई- विरार: विरारमधल्या (Virar News) मोहक सिटीसमोर दोन गटात राडा झाला आहे. लाठ्या काठ्या आणि लोखंडी रॉडने तुंबळ हाणामारी झाली आहे. हाणामारीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. बाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोलिसांनी (Police) धाव घेतली. तसेच, गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे विरारला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे.
विरार पूर्व मनवेल पाडा, येथील मोहक सिटी समोरील मुख्य रस्त्यावर दोन गटात तुंबळ हाणामारी झाली होती. मंगळवारी रात्री 11:30 च्या सुमारास लाठी काठ्या आणि लोखंडी रॉडने ही हाणामारीची घटना घडली होती. यात एकाच्या डोक्याला लोखंडी रॉडचा मार लागला असून, तो जखमी झाला आहे. हाणामारी पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठी चार्ज करावा लागला. या हाणामारीचे कारण स्पष्ट झाले नसून, घटना स्थळावरून सर्वच जण फरार झाले आहेत.
लाठीचार्जचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
मुख्य रस्त्यावर हाणामारी होत असल्याने विरार पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. अशा घटना रोखण्यासाठी पोलिसांनी परिसरात गस्त वाढवावी अशी मागणी आता सर्व सामान्य नागरिकांमधून होत आहे. हाणामारीच्या नंतरचा पोलिसांच्या सौम्य लाठीचार्जचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल होत असून पोलीस आता या घटनेचा तपास करत आहेत.
अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पोलिसांचे आवाहन
पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर दोन्ही गट शांत झाले आणि वाद मिटला. मात्र, पोलीस ठाण्यातही रात्री मोठा जमाव जमला होता. सध्या शांतता असून, पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे. तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता, अफवा पसरवणाऱ्या लोकांची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
लातूरच्यामध्ये शिस्त पालन समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून गावकऱ्यांमध्ये राडा
लातूरच्या (Latur) औसा तालुक्यातील लामजनामध्ये शिस्त पालन समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून गावकऱ्यांमध्ये राडा झाला आहे. शाळेतच हाणामारी (School Free Style Fighting) झाल्याने शिक्षक आणि विद्यार्थी हतबल झाले. गावकऱ्यांमधील राडा, हाणामारी मोबाईल कॅमेरात कैद झाली आहे. शालेय व्यवस्थापन समिती निवडीवरुन शाळेत पालक आणि ग्रामस्थांमध्ये राडा झाला आहे. लामजना येथील जिल्हा परिषद शाळेतील हा घडला आहे. गावातील काही लोकांनी जाणीवपूर्वक वाद केल्याचा आरोप पालकांनी केला आहे. हातात दगड घेऊन पालक आणि काही नागरिक समोरासमोर भिडले होते. मोबाईल कमेऱ्यात कैद झालेला व्हिडीओ समोर आला आहे.